Kiara Advani Sidharth Malhotra : आली समीप लग्नघटीका... फुलांनी सजलाय सूर्यगढ पॅलेस; आज सिद्धार्थ मल्होत्राची होणार कियारा आडवाणी
Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा अखेर आज लग्नबंधनात अडकणार आहेत.
Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Update : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये आज त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लग्नसोहळ्यासाठी सूर्यगढ पॅलेस फुलांनी सजवण्यात आला आहे. तसेच विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावटीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
कियारा-सिद्धार्थच्या 'नो फोन पॉलिसी'मुळे चाहते नाराज
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या लग्नातदेखील 'नो फोन पॉलिसी'चा अवलंब करण्यात आला आहे. कुटुंबीय, पाहुणे, मित्रमंडळी, बॉलिवूड सेलिब्रिटी यांच्यासह हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनादेखील लग्नसोहळ्यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे कियारा-सिद्धार्थच्या मेहंदी, संगीतचे फोटो व्हिडीओ चाहत्यांना पाहता आले नाहीत. त्यामुळे 'नो फोन पॉलिसी'मुळे चाहते नाराज झाले आहेत.
शाही थाटात रंगणार सिद्धार्थ-कियाराचा लग्नसोहळा
सिद्धार्थ-कियाराचा लग्नसोहळा शाही थाटात पार पडणार आहे. या कुटुंबीय, जवळचे मित्रमंडळी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला 100 ते 150 मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कियारा-सिद्धार्थची लव्हस्टोरी जाणून घ्या...
सिद्धार्थ आणि कियाराने 'शेरशाह' या सिनेमात एकत्र काम केलं आहे. पण या सिनेमाआधीच ते एकमेकांना ओळखत होते. करिअरसाठी संघर्ष करत असतानाच त्यांची भेट झाली होती. त्यांची पहिली भेट कियाराच्या 'लस्ट स्टोरीज'च्या रॅपअप पार्टीमध्ये झाली होती. या पार्टीनंतर त्यांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर दोघांनाही 'शेरशाह' या सिनेमासाठी विचारणा झाली. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांची जवळीक वाढली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 2021 साली त्यांनी त्यांचं नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही घरुन या लग्नाला संमती मिळाली आणि आज ते लग्नबंधनात अडकणार आहेत.
कियारा-सिद्धार्थच्या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. ईशा अंबानी, कबीर सिंह, शाहिद कपूर, मीरा राजपूत, करण जौहर, मनीष मल्होत्रा आणि जूही चावला असे अनेक सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
सिद्धार्थ-कियारा लग्नानंतर कुठे राहणार?
सिद्धार्थ सध्या मुंबईतील कार्टर रोड परिसरात राहतोय. तर कियारा दक्षिण मुंबईत राहत आहे. पण आता लग्नानंतर ते जुहू परिसरात राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. सिद्धार्थने जुहू येथील एक सी-फेसिंग घर विकत घेतलं आहे. या घराची किंमत तब्बल 70 कोटी आहे.
संबंधित बातम्या