Bollywood Actor : खेडेगावातला मुलगा ते बॉलिवूड स्टार; 'असा' आहे सुपरस्टार अभिनेत्याचा फिल्मी प्रवास
Bollywood Actor : आलिया भट्ट ते दीपिका पादुकोणपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे.
Siddhant Chaturvedi : बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक सेलिब्रिटींनी मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. 'गहराइयां','गली बॉय','खो गए हम कहां' सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सिद्धांत चतुर्वेदीने (Siddhant Chaturvedi) बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यूपीमधील या अभिनेत्याने अनेक सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे. सिद्धांत चतुर्वेदीने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. सिद्धांत चतुर्वेदी व्यावसायिक चित्रपटांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. आलिया भट्ट ते दीपिका पादुकोणपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत सिद्धांतने काम केलं आहे. सिद्धांत चतुर्वेदीने नुकतचं 31 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.
सिद्धांत चतुर्वेदी कसा झाला बॉलिवूड स्टार?
सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नवेदी नंदा सध्या आपल्या नात्यामुळे चर्चेत आहे. सिद्धांत चतुर्वेदी उत्तर प्रदेशमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. सिद्धांतने CA व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण अभिनेत्याच्या नशिबात मात्र वेगळचं काहीतरी लिहिलं आहे. सीएचा अभ्यास सुरू असतानाच सिद्धांतनेच मॉडेलिंगमध्ये करिअर करायला सुरुवात केली. पुढे 'लाइफ सही है'मध्ये तो दिसून आला. या चित्रपटात चार रुममेट्सची गोष्ट दाखवण्यात आली आहे. त्याच्या पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज सिद्धांत बॉलिवूड स्टार आहे.
'या' चित्रपटाने सिद्धांतचं आयुष्य बदललं
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्टच्या 'गली बॉय' या चित्रपटाच्या माध्यमातून सिद्धांत चतुर्वेदी रातोरात सुपरस्टार झाला. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत होता. चित्रपट सुपरहिट झाला. सिद्धांत चतुर्वेदीच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांत आणि वेबसीरिजमध्ये काम केलं. पण 'गली बॉय' या चित्रपटाच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला. सिद्धांत चतुर्वेदी 2022 मध्ये जीक्यू इंडियाच्या टॉप 30 इनफ्लुएंटली यंग इंडियन्सच्या यादीत सहभागी झाला होता.
सिद्धांत चतुर्वेदी शेवटचा 'खो गए हम कहाँ' या चित्रपटात झळकला आहे. या चित्रपटात अनन्या पांडे आणि आदर्श गौरवदेखील मुख्य भूमिकेत होते. डिसेंबरमध्ये नेटफ्लिक्सवर या चित्रपटाचा प्रीमिअर झाला होता.
'गली बॉय'च्या एक महिन्याआधी सिद्धार्थला 'ब्रह्मास्त्र'ची ऑफर मिळाली होती. सिद्धांतने एका मुलाखतीत सांगितलं होतं की,"ब्रह्मास्त्र' चित्रपटासाठी कोणतीही ऑडिशन झाली होती. हा अॅक्शनपट असल्याने मार्शल आर्ट येतं का एवढचं मला विचारण्यात आलं होतं. हा एक अॅक्शनपट होता. या चित्रपटासाठी पाच वर्षे लागणार होते. मला काही कळलं नाही आणि मी चित्रपटासाठी नकार कळवला. पण यामुळे कास्टिंग सर्किटने मला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं".
संबंधित बातम्या