एक्स्प्लोर

Shreyas Talpade: चित्रपटामधील एका सीनमुळे श्रेयसला मागावी लागली माफी; शेअर केली पोस्ट, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

श्रेयस (Shreyas Talpade) हा त्याच्या एका चित्रपटामधील सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या संदर्भात श्रेयसनं एक पोस्ट देखील शेअर केली आहे.

Shreyas Talpade: प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा त्याच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकतो. सध्या श्रेयसनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. श्रेयस हा त्याच्या एका चित्रपटामधील सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. श्रेयसचा कमाल धमाल मालामाल (Kamaal Dhamaal Malamaal) हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला होता. आता 11 वर्षांनंतर या चित्रपटामधील एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सीनच्या व्हिडीओला रिप्लाय करत श्रेयसनं माफी मागितली आहे. 

श्रेयसची पोस्ट

कमाल धमाल मालामाल या चित्रपटामधील एका सीनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या सीनवर अनेक नेटकरी सध्या आक्षेप घेत आहेत. या व्हायरल व्हिडीओला रिप्लाय करत श्रेयसनं एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये श्रेयसनं लिहिलं, 'एखाद्या चित्रपटाचं शूटिंग करताना अनेक घटकांचा विचार केला जातो. चित्रपटामधील सीनच्या शूटिंग दरम्यान एखाद्याची मानसिकता, दिग्दर्शकाच्या गरजा, वेळेची मर्यादा आणि बऱ्याच गोष्टींचा विचार केला जातो. पण व्हिडीओमध्ये जे काही दिसत आहे त्यासाठी मी स्पष्टीकरण देत आहे, असं नाही. मी एवढेच म्हणू शकतो की, हे पूर्णपणे अनावधानाने झाले होते आणि मी त्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो. मी ते दिग्दर्शकाच्या निदर्शनास आणायला हवे होते. मी कोणाच्याही भावना मुद्दामून दुखावणार नाही किंवा असे काहीही पुन्हा करणार नाही.'  श्रेयासच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 


Shreyas Talpade: चित्रपटामधील एका सीनमुळे श्रेयसला मागावी लागली माफी; शेअर केली पोस्ट, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

कमाल धमाल मालामाल या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये श्रेयससोबतच नाना पाटेकर, ओम पूरी आणि परेश रावल यांनी प्रमुख भूमिका साकारली आहेत. श्रेयस तळपदेनं कमाल धमाल मालामाल या चित्रपटात जॉनी ही भूमिका साकारली आहे.

श्रेयस तळपदेचे चित्रपट:

श्रेयसच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्याच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. श्रेयस हा मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. इक्बाल, पोस्टर बॉईज, गोलमाल 3, ओम शांती ओम यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच त्यानं  'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेमधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. गेल्या वर्षी श्रेयसचा 'आपडी थापडी' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

Aapdi Thaapdi : श्रेयस तळपदेच्या "बेबीफेस"ची सोशल मीडियावर चर्चा; व्हिडीओ होतोय व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
Sohail Khan Reveals He Was Abused: 'लहानपणी माझ्यासोबत अत्याचार, घाबरून...', सलमान खानच्या धाकट्या भावासोबत नको नको ते घडलं, स्वत:च केला खुलासा
'लहानपणी माझ्यासोबत अत्याचार, घाबरून...', सलमान खानच्या धाकट्या भावासोबत नको नको ते घडलं, स्वत:च केला खुलासा
The Odyssey Movie Review: ख्रिस्तोफर नोलनचा मास्टरपीस, अंगावर शहारे आणणारे 'द ओडिसी'चे सीन्स; अद्भूत सीनेमॅटिक सफर
The Odyssey Movie Review: ख्रिस्तोफर नोलनचा मास्टरपीस, अंगावर शहारे आणणारे 'द ओडिसी'चे सीन्स; अद्भूत सीनेमॅटिक सफर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
Embed widget