Mirzapur 3 : 'मिर्झापूर 3'च्या शूटिंगला पुढच्या महिन्यापासून होणार सुरुवात; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Mirzapur 3 Shooting Date : 'मिर्झापूर 3' मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल आणि श्वेता त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहेत. तिसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे.
Mirzapur 3 Shooting Date : लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर'च्या (Mirzapur-3)तिसऱ्या सीझनची नवी माहिती समोर आली आहे. मिर्झापूर सीझन 3 चे शूटिंग पुढील महिन्यापासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिर्झापूर सीरिजचा तिसरा सीझन आणखी दमदार असणार आहे. या सीझनमध्येही कालिन भैया आणि गुड्डू भैय्या आपली अभिनयाची जादू दाखवतील यात शंका नाही. 'मिर्झापूर 3'मध्ये पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), अली फजल (Ali Fazal) आणि श्वेता त्रिपाठी (Shewta Tripathi) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेच्या स्थानिक ऑडिशन्स उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये पूर्ण झाल्या आहेत.
शनिवारी लखनौमध्ये मिर्झापूर 3 च्या स्थानिक कलाकारांच्या ऑडिशन्स पूर्ण झाल्या. ऑगस्टच्या अखेरीस लखनौ चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. मिर्झापूर 3 च्या ऑडिशन्स 15 आणि 16 जुलै रोजी गोमतीनगरमध्ये घेण्यात आल्या.
View this post on Instagram
अली फजल आणि श्वेता त्रिपाठी यांच्या सीनचे चित्रीकरण लखनौमध्ये होणार आहे. यासाठी जुन्या लखनौमधील चौक, इमामबारा, रूमी दरवाजा, काकोरी, मलिहाबादसह आसपासची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. वेब सिरीजचे शेड्युल जवळपास एक महिन्याचे असून, त्यात स्थानिक कलाकारांची निवड करण्यात आली आहे.
मिर्झापूर 3 चे लोकल लाईन प्रोड्युसर रती शंकर त्रिपाठी आहेत. 'मिर्झापूर 2' चा काही भाग लखनौमध्ये शूट करण्यात आला होता. 'मिर्झापूर 3'चे शूटिंग सुरू झाले आहे.
View this post on Instagram
अलीकडेच अभिनेत्री रसिका दुग्गलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिसऱ्या सीझनचे शूटिंग सुरू करण्याबाबत सांगितले आहे. यावेळी अली फजलचे जबरदस्त परिवर्तन या मालिकेत पाहायला मिळणार आहे. अली दमदार अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. त्याच्या भूमिकेसाठी तो कुस्तीही शिकत आहे. 'मिर्झापूर 3'च्या तिसऱ्या सीझनमध्ये भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bajrangi Bhaijaan 2 : बजरंगी भाईजानच्या सिक्वेलमध्ये होणार 'हे' मोठे बदल; कथेशी संबंधित लेखकाने केला मोठा खुलासा
- Kesariya Song Released: आलिया-रणबीरच्या प्रेमाची कहाणी, ‘ब्रह्मास्त्र’चं ‘केसरिया’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
- Brahmastra: 'ब्रह्मास्त्र' च्या ट्रेलरमधील 'त्या' सीनमुळे झालेल्या वादावर अयान मुखर्जीची प्रतिक्रिया ; म्हणाला...