(Source: ECI / CVoter)
Bajrangi Bhaijaan 2 : बजरंगी भाईजानच्या सिक्वेलमध्ये होणार 'हे' मोठे बदल; कथेशी संबंधित लेखकाने केला मोठा खुलासा
Bajrangi Bhaijaan 2 Story : अभिनेता सलमान खानचा प्रसिद्ध चित्रपट बजरंगी भाईजानच्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Bajrangi Bhaijaan 2 Story : 2015 मध्ये बॉलिवूडचा धमाकेदार चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं नाव होतं बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijaan). या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. हा चित्रपट बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. असे असताना, आता हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलमानच्या बजरंगी भाईजानच्या सिक्वेलबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. ज्यामध्ये चित्रपटाच्या लेखकाने भाग 2 च्या कथेवर मोठे विधान केले आहे.
बजरंगी भाईजान 2 ची कथा कशी असेल?
बजरंगी भाईजान चित्रपटाचे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी एका मुलाखतीत बजरंगी भाईजानच्या सिक्वेलबद्दल संवाद साधला आहे. सिनेमाच्या पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर निर्मात्यांनी बजरंगी भाईजान 2 बनवण्याची योजना आखली आहे. विजयेंद्र प्रसाद - बजरंगी भाईजान 2 ची कथा पहिल्या भागाच्या तुलनेत खूपच वेगळी असणार आहे. यावेळी बजरंगी भाईजानची कथा 10 वर्षांच्या लीपमध्ये दाखवण्यात येणार आहे. जी नेहमीपेक्षा अधिक मनोरंजक असेल. सध्या चित्रपटाच्या कथेवर लक्ष केंद्रित केले आहे. तरी या कथेबाबत प्राथमिक माहिती सलमान खानला सांगितली आहे. जी त्याला आवडली आहे. असे लेखक म्हणाले.
बजरंगी भाईजानचे टायटल वेगळे असेल
विशेष म्हणजे, 2021 साली बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने बजरंगी भाईजान सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर याच्या सिक्वेलबाबत कल्पना दिली होती. आता चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान या सिक्वेलचं नाव नेमकं काय ठेवणार यावर चर्चा सुरु आहे. तसेच, असेही सांगण्यात आले आहे की, सलमानच्या भाईजान आणि टायगर 3 नंतर या चित्रपटाचा विचार होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Kesariya Song Released: आलिया-रणबीरच्या प्रेमाची कहाणी, ‘ब्रह्मास्त्र’चं ‘केसरिया’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
- Brahmastra: 'ब्रह्मास्त्र' च्या ट्रेलरमधील 'त्या' सीनमुळे झालेल्या वादावर अयान मुखर्जीची प्रतिक्रिया ; म्हणाला...
- Brahmastra: 'ब्रह्मास्त्र' च्या ट्रेलरमधील एका सीनमुळे भडकले नेटकरी; चित्रपट बायकॉट करण्याची युझर्सकडून मागणी