Brahmastra: 'ब्रह्मास्त्र' च्या ट्रेलरमधील 'त्या' सीनमुळे झालेल्या वादावर अयान मुखर्जीची प्रतिक्रिया ; म्हणाला...
ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटातील एका सीनमुळे अनेक नेटकरी या चित्रपटला बायकॉट करण्याची मागणी करत होते.
Ayan Mukerji : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरमधील वीएफएक्स, सस्पेन्स, कलाकारांचे लुक्स आणि अभिनय या सर्व गोष्टींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले. पण सध्या वेगळ्याच कारणांमुळे ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका सीनमुळे सोशल मीडियावर वाद सुरु होता. ट्रेलरमधील एका सीनमध्ये रणबीर हा पळत येतो आणि घंटा वाजवतो असं दिसत आहे. यामध्ये रणबीर हा शूज घालून घंटा वाजवताना दिसतोय. या सीनमुळे अनेक नेटकरी या चित्रपटला बायकॉट करण्याची मागणी करत होते. आता या वादावर चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीनं (Ayan Mukerji) प्रतिक्रिया दिली आहे.
अयान मुखर्जीनं शेअर केली पोस्ट
अयान मुखर्जीनं पोस्टमध्ये सांगितलं, 'काही लोक ट्रेलरमधील एक सीन पाहून नाराज झाले. त्या सीनमध्ये रणबीर शूज घालून घंटा वाजवत आहे. मी या चित्रपटाचा दिग्दर्शक असल्यानं मला हे सांगायचं आहे की, चित्रपटामध्ये रणबीर हा मंदिराची नाही तर दुर्गा पूजेच्या मंडपामधील घंटा वाजवत आहे. माझे कुटुंब देखील दुर्गा पूजेचे आयोजन करते. गेली 75 वर्ष आम्ही ही पूजा करत आहोत. या पूजेला मी बालपणापासून जातो. आम्हाला माहिती आहे की, फक्त मंदिरात किंवा जिथे देवीची मूर्ती असते तिथेच शूज घालून जाऊ नये. मंडपामध्ये प्रवेश करताना आपण शूज घालतो. ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये भारतील संस्कृती, परंपरा आणि इतिहास या गोष्टींचा सन्मान करण्यात आला आहे. '
View this post on Instagram
नऊ सप्टेंबर रोजी चित्रपट होणार रिलीज
रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय हे कलाकार ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये प्रमूख भूमिका साकारणार आहेत. नऊ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांना आलिया आणि रणबीरची ऑन स्क्रिन केमिस्ट्री बघायला मिळणार आहे.
हेही वाचा: