Shivrayancha Chhava : जय शिवराय! 'शिवजयंती'चा 'शिवरायांचा छावा'ला मोठा फायदा; रिलीजच्या चार दिवसांत केली 5.12 कोटींची कमाई
Shivrayancha Chhava : दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 5.12 कोटींची कमाई केली आहे.
Shivrayancha Chhava Box Office Collection Day 4 : दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 5.12 कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. शिवजयंतीचा (Shiv Jayanti) या सिनेमाला फायदा झाला आहे.
'शिवरायांचा छावा' गाजवतोय बॉक्स ऑफिस (Shivrayancha Chhava Box Office Collection)
शिवजयंतीनिमित्त पुणे सिटी प्राईड येथे 'शिवरायांचा छावा' या सिनेमाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करण्यात आला. लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सर्वच प्रेक्षक 'शिवरायांचा छावा' हा सिनेमा पाहून भारावले आहेत. कुटुंब आणि मित्रमंडळींसह शिवप्रेमी आणि सिनेप्रेक्षक मोठ्या संख्येने हा सिनेमा पाहायला जात आहेत. सिनेमागृहात जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत आहेत.
View this post on Instagram
छत्रपती शिवाजी महाराजांचे सिनेमे बनवणं किती अवघड?
'शिवरायांचा छावा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्पाल लांजेकर यांनी सांभाळली आहे. याआधी त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या आयुष्यावर आधारित अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हे सिनेमे बनवणं किती अवघड आहे याबद्दल बोलताना दिग्पाल लांजेकर म्हणाले,"माझी संपूर्ण टीम शिवकालीन सिनेमांसाठी सरावली गेली आहे. त्यामुळे तो वेग मला साध्य होतो".
माझ्या सिनेमात मी क्रिएटिव्ह मोह टाळतो : दिग्पाल लांजेकर
दिग्पाल लांजेकर पुढे म्हणाले,"इतिहासाचा आणि फिल्म मेकिंगचा सिनेमाच्या टीमने खूप अभ्यास केला आहे. प्रेक्षकांपर्यंत हे सिनेमे पोहोचवण्यात अनेक मंडळींचा मोलाचा वाटा आहे. पण प्रत्येक सिनेमाला तरीही दीड-दोन वर्षाचा वेळ लागतो. माझ्या सिनेमात मी क्रिएटिव्ह मोह टाळतो. कोणत्याही पद्धतीचा वाद होईल अशा गोष्टी मी सिनेमात टाळतो. कोणाच्याही भावना दुखावतील अशा कलाकृतीची निर्मिती करणं टाळतो. जेव्हा मनामनात शिवराय जन्म घेतील तेव्हाच शिवजयंती साजरी होईल".
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. आलेल्या संकटांवर पाय रोऊन उभे राहत छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्य, हुशारी आणि धाडस या गुणांचे दर्शन ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमात घडत आहे.
संबंधित बातम्या