एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नेटफ्लिक्सविरोधात कोणतीही तक्रार नाही : शिवसेना
संपूर्ण देशाला एन्गेज केलेल्या टी. व्ही. पासून स्वत:कडे ओढणाऱ्या नेटफ्लिक्सवर आता टीकांचं सत्र सुरु झालं आहे. अमेरिकन ऑनलाईन स्ट्रीमिंग कंपनी नेटफिल्क्सविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मुंबई : संपूर्ण देशाला एन्गेज केलेल्या टीव्हीपासून स्वत:कडे ओढणाऱ्या नेटफ्लिक्सवर आता टीकेचं सत्र सुरु झालं आहे. अमेरिकन ऑनलाईन स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्सविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. नेटफ्लिक्स आपल्या विविध मालिकांमधून जागतिक स्तरावर भारताचं चुकीचं चित्र उभं करत असल्याचा आरोप रमेश सोलंकी या व्यक्तीने केला आहे. ही व्यक्ती शिवसेनेच्या आयटी सेलमध्ये कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. परंतु नेटफ्लिक्सविरोधात शिवसेनेने कोणतीही तक्रार केली नसल्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे.
रमेश सोलंकी यांच्या तक्रारीनंतर नेटफ्लिक्सविरोधात शिवसनेने तक्रार केली असल्याच्या बातम्या पसरु लागल्या. त्यानंतर शिवसेनेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलद्वारे जाहीर केले की, शिवसेना पक्षाच्या वतीने नेटफ्लिक्सविरोधात तक्रार नोंदवल्याबद्दलची बातमी खोटी आहे. सर्व प्रसारमाध्यमांना विनंती आहे की जनतेची दिशाभूल करणार्या चुकीच्या बातम्या छापण्यापूर्वी आमच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांकडून याची पुष्टी करावी.
नुकतीच प्रदर्शित झालेली सेक्रेड गेम्स (Sacred Games)(दुसरे पर्व), लैला (Leila) आणि राधिका आपटेच्या घुल (Ghoul) या वेब सीरिजविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्टॅण्ड अप कॉमेडियन हसन मिव्हाज यांनी त्यांच्या शोमध्ये देशाविरोधी कृत्य केल्याचाही आरोप रमेश यांनी केला आहे. नेटफ्लिक्स इंडियावरील प्रत्येक मालिकेचा जागतिक स्तरावर भारताची बदनामी करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल नेटफ्लिक्सविरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे आवाहन सोलंकी यांनी केले आहे. या तक्रारीची एक प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांनाही पाठवल्याचे सोलंकी यांनी सांगितले.
दरम्यान, आमचे चित्रण संपूर्णपणे काल्पनिक आहे आणि आम्ही कुणाच्याही भावना दुखावल्या नसल्याचे 'लिला' या वेब सीरिजचे लेखक पॅट्रिक ग्रॅहम यांनी स्पष्ट केलं.
काही दिवसांपूर्वी रेड लेबल चहाच्या जाहिरातमध्ये हिंदूंचा अपमान झाल्याचा दावा करत अनेकांनी रेड लेबलचा निषेध केला होता. नेटीझन्सनी #BoycottRedLabel या हॅशटॅगद्वारे विरोध करण्यात आला.
शिवसेना पक्षाच्या वतीने @NetflixIndia विरोधात तक्रार नोंदवली आहे ही बातमी खोटी आहे. सर्व प्रसारमाध्यमांना विनंती आहे की जनतेची दिशाभूल करणार्या चुकीच्या बातम्या छापण्यापूर्वी आमच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांकडून याची पुष्टी करावी.
— Shivsena Communication (@ShivsenaComms) September 4, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
निवडणूक
क्रीडा
Advertisement