Sharad Ponkshe : 'नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचा सातासमुद्रापार होणार प्रयोग; शरद पोंक्षेंनी पोस्ट शेअर करत दिली माहिती
Nathuram Godse Boltoy : शरद पोंक्षेंच्या 'नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचा अमेरिकेत प्रयोग होणार आहे.
![Sharad Ponkshe : 'नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचा सातासमुद्रापार होणार प्रयोग; शरद पोंक्षेंनी पोस्ट शेअर करत दिली माहिती Sharad Ponkshe Nathuram Godse Boltoy Drama Marathi Natak US Tour Marathi Actor Entertainment Sharad Ponkshe : 'नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचा सातासमुद्रापार होणार प्रयोग; शरद पोंक्षेंनी पोस्ट शेअर करत दिली माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/01/94f93ab993b5a85bb7070a8c8e143b061698826861802254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sharad Ponkshe on Nathuram Godse Boltoy : अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सध्या चर्चेत आहे. शरद पोंक्षेंच्या 'नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचे आता 50 प्रयोग पार पडले असून आता सातासमुद्रापारदेखील या नाटकाचे प्रयोग होणार आहे. शरद पोंक्षे यांनी खास पोस्ट शेअर करत नाट्यरसिकांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
शरद पोंक्षे यांच्या 'नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचे अमेरिकेत प्रयोग होणार आहेत. त्यामुळे अमिरिकेतील नाट्यरसिकांना आता 'नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक पाहायला मिळणार आहे. 'नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचा अमेरिका दौरा आयोजित करण्यात आला आहे. 2024 मध्ये हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
View this post on Instagram
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा इतिहास रंगमंचावर नव्याने अवतरणार
'नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा इतिहास रंगमंचावर नव्याने अवतरणार आहे. प्रदीप दळवी (Pradeep Dalvi) यांनी 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचं लेखन केलं असून विनय आपटे (Vinay Apte) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर या नाटकाचे प्रयोग थांबवण्यात आले होते. त्यानंतर सहा वर्षांनी आता पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर आलं आहे. आतापर्यंत या नाटकाचे 50 प्रयोग पार पडले आहेत.
शरद पोंक्षे यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचे पुन्हा प्रयोग होणार असल्याची घोषणा केली होती. एक व्हिडीओ शेअर करत ते म्हणाले होते,"मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचा शेवटचा प्रयोग केला. त्यानंतर जाहीर केलं की, मी यापुढे रंगभूमीवर नथुरामच्या भूमिकेत कधीही दिसणार नाही. मी त्या शब्दाशी प्रामाणिक राहिलो. गेली साडेपाच वर्षे मी हे नाटक केलं नाही.पण गेली पाच वर्ष महाराष्ट्रात व्याख्यानाच्या निमित्ताने फिरत असताना अनेकांनी मला या नाटकाचे प्रयोग करा, असे सांगितले. आमच्या पुढच्या पिढ्यांना हे नाटक पाहायचं आहे, थोडे तरी प्रयोग करा, असे वारंवार लोक मला सांगत होते".
'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाबद्दल जाणून घ्या...
'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकात शरद पोंक्षे यांनी नथुरामाची भूमिका साकारली आहे. या नाटकाचं लेखन प्रदीप दळवी (Pradeep Dalvi) यांनी केलं आहे. तर विनय आपटे (Vinay Apte) यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 1997 मध्ये या नाटकाला विरोध झाल्यानंतर 817 व्या प्रयोगानंतर हे नाटक बंद करण्यात आलं होतं. शरद पोंक्षे यांच्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकासह त्यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या
Sharad Ponkshe : स्वातंत्र्यदिनी शरद पोंक्षेंची मोठी घोषणा; प्रेक्षकांच्या आग्रहाखातर 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचे पुन्हा प्रयोग करणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)