Shahrukh Khan : मन्नतमध्ये ग्रँड सेलिब्रेशन! किंगखानला मिळाला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
Shahrukh Khan : शाहरुख खानने फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पटकावला आहे.
Shahrukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला (Shahrukh Khan) फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे मन्नतमध्ये ग्रँड सेलिब्रेशन करण्यात आलं. या पार्टीत अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती.
किंग खान 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून कमबॅक करतो आहे. त्याचे अनेक सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. दरम्यान शाहरुखला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुखने मन्नतवर एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत अनेक देशांचे राजदूत उपस्थित होते.
Delighted to meet in Mumbai a Knight of the highest 🇫🇷 award, the Légion d'Honneur, a title befitting for the 🇮🇳Shah of #Bollywood ! Dear @iamsrk my sincere appreciation for your hospitality this afternoon.#ShahRukhKhan pic.twitter.com/RZe0oUI7wp
— Jean-Marc Sere-Charlet (@SereCharlet) May 5, 2022
जंगी पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पार्टीत शाहरुख पाहुणचार करताना दिसत आहे. भारतासह संपूर्ण जगात सांस्कृतिक दृष्ट्या शाहरुखचे योगदान खूप मोठे आहे. त्याच्या याच योगदानामुळे त्याला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे. शाहरुखला 3 मे रोजी ताजमहाल पॅलेसवर या पुरस्काराने गौरविण्यात आलं. किंग खानचा 'देवदास' सिनेमा फ्रान्समधील सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. फ्रान्सच्या नागरिकांना शाहरुख आणि त्याचे सिनेमे आवडतात. त्यामुळेच किंग खानला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'द लीजन ऑफ ऑनर' (the Légion d’Honneur) मिळाला आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या