Savaniee Ravindrra : गायिका सावनी रविंद्रचा मातृदिन खास, 'माँ कोई तुझसा नहीं' गाणं प्रदर्शित
Savaniee Ravindrra : गायिका सावनी आणि शार्वीचा यंदाचा मातृदिन खास आहे.
![Savaniee Ravindrra : गायिका सावनी रविंद्रचा मातृदिन खास, 'माँ कोई तुझसा नहीं' गाणं प्रदर्शित Singer Savaniee Ravindrra Mothers Day Special Maa Koi Tujhsa Nahin song out Savaniee Ravindrra : गायिका सावनी रविंद्रचा मातृदिन खास, 'माँ कोई तुझसा नहीं' गाणं प्रदर्शित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/07/fcda2c51f45d5bcae3d617af169ebd73_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Savaniee Ravindrra : गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra) आणि शार्वीचा यंदाचा मातृदिन खास आहे. सावनीचे 'मॉं कोई तुझसा नहीं' (Maa Koi Tujhsa Nahin) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यंदाचा पहिला मातृदिन सावनी तिच्या मुलीसोबत साजरा करणार आहे.
सावनीने नुकतेच आई आणि मुलीचं गोडं नातं मांडणारं 'मॉं कोई तुझसा नहीं' हे हिंदी गाणं नुकतच प्रदर्शित केलं आहे. याआधीदेखील सावनीने शार्वीसाठी 'लडिवाळ' ही अंगाई गायली होती. ही अंगाई चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.
View this post on Instagram
'मॉं कोई तुझसा नहीं' या गाण्याविषयी सावनी रविंद्र म्हणाली,"कारण मी आई झाल्यानंतरचा हा पहिलाच मातृदिन आहे. माझ्यासाठी एक वेगळीच अनुभूती आहे. आई होणं हे अजिबात सोप्पं नाही. आता स्वतः आई झाल्यावर कळतंय आपली आई किती श्रेष्ठ आहे. आईने आपल्यासाठी किती गोष्टी केल्या आहेत. 'मॉं कोई तुझसा नहीं' हे गाणं मी सर्व मातांना समर्पित करते".
सावनी पुढे म्हणाली, आपली आपल्या आईप्रतीची कृतज्ञता केवळ मातृदिनाच्या दिवशी न व्यक्त करता रोज व्यक्त करायला हवी. आई होणं ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. लडिवाळा या अंगाईत शार्वी फारच लहान होती. त्या गाण्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. तर आता शार्वी मोठी झाली आहे. या गाण्यात शार्वी काय काय धम्माल करते हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Janhit Mein Jaari : 'जनहित में जारी' ट्रेलर आऊट; सामाजिक संदेश देणारा सिनेमा
Say No To War : 'से नो टू वॉर' गाणं रिलीज; जावेद अख्तर म्हणाले, 'युद्धाच्या काळात अशा गाण्यांची गरज'
Funeral Marathi Movie : चक्क स्मशानभूमीत पार पडला चित्रपटाच्या पोस्टर लाँचिंगचा सोहळा! ‘फनरल’च्या टीमने हाती घेतला नवा उपक्रम!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)