Shahrukh Khan : किंग खानच्या 'मन्नत'वरील 25 लाखाची नेम प्लेट अचानक गायब; नेमकं काय घडलं?
Shahrukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या बंगल्यावर लावलेली 25 लाखाची नेम प्लेट अचानक गायब झाली आहे.
Shahrukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पण यंदा शाहरुख नेम प्लेटमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखने मन्नत (Mannat) बंगल्याची नेम प्लेट बदलली होती. पण आता ही 25 लाखाची नेम प्लेट अचानक गायब झाली आहे.
किंग खानचा बंगला मुंबईतील वांद्रा याठिकाणी आहे. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते मन्नतबाहेर गर्दी करत असतात. दरम्यान शाहरुखच्या घराबाहेर 25 लाखाची नेम प्लेट दिसत नसल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. रिपोर्टनुसार, मन्नतच्या 25 लाखाच्या नेमप्लेटवरून एक डायमन्ड खाली पडला आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी नेमप्लेट काढण्यात आली आहे.
Live from our Jannat ❤️#ShahRukhKhan pic.twitter.com/47XB3wmDyi
— Shah Rukh Khan Warriors FAN Club (@TeamSRKWarriors) May 26, 2022
शाहरुखच्या घराबाहेर 25 लाखाची नेमप्लेट नसलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेमप्लेट दुरुस्त झाल्यावर शाहरुख ती नेमप्लेट पुन्हा लावणार आहे. शाहरुखच्या घरासमोर असलेल्या महागड्या नेम प्लेटची डिझाइन गौरी खानने केली आहे. मन्नतच्या नेम प्लेटची संपूर्ण रचना गौरी खानच्या देखरेखीखाली करण्यात आली आहे. मन्नतची नेम प्लेट अनेकदा बदलण्यात आली आहे.
शाहरुखचे आगामी सिनेमे
'झिरो' सिनेमात शाहरुख शेवटचा दिसला होता. या सिनेमात शाहरुख सोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ दिसून आले होते. शाहरुखचा 'पठाण' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. 2023 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच नयनतारा आणि सान्या मल्होत्रासोबतदेखील शाहरुख एक सिनेमा करत आहे.
Aaj #Mannat se name plate gayab hai matlab full on experiment chal raha hai @gaurikhan pic.twitter.com/v6ddOlx2H4
— Javed (@JoySRKian_2) May 11, 2022
शाहरुखने नवीन चित्रपटाची घोषणा केली
शाहरुख खानने नुकतीच त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. त्याच्या आगामी सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) करणार आहेत. शाहरुखच्या नव्या चित्रपटाचे नाव 'डंकी' (Dunki) असे आहे.
संबंधित बातम्या
Shah Rukh Khan : किंग खानच्या 'Mannat'ची नवी नेम प्लेट; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
Dunki : राजकुमार हिरानींसोबत दिसला शाहरुख खान, ‘डंकी’च्या सेटवरील नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)