Shah Rukh Khan : किंग खानच्या 'Mannat'ची नवी नेम प्लेट; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याची नेम प्लेट नुकतीच बदलण्यात आली आहे. गौरी खानच्या देखरेखीखाली ही नेम प्लेट तयार करण्यात आली आहे.
![Shah Rukh Khan : किंग खानच्या 'Mannat'ची नवी नेम प्लेट; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल shah rukh khan bunglow mannat new name plate price know in details Shah Rukh Khan : किंग खानच्या 'Mannat'ची नवी नेम प्लेट; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/006feadb4ae646c6eb1b8c8d54383019_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mannat Name Plate Price : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खान (Shah Rukh Khan) त्याच्या चित्रपट प्रोजेक्ट्सबदद्ल तर चर्चेत असतोच. पण, आता शाहरूख खान एका नवीन कारणाने पुन्हा चर्चेत आला आहे. शाहरुख खान अलीकडेच 'मन्नत' (Mannat) या घरातील बदलांमुळे देखील चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी किंग खानच्या घराबाहेरील 'मन्नत' नावाची नेम प्लेट बदलण्यात आली आहे. शाहरुखच्या घराच्या या नव्या नेम प्लेटची सर्वत्र चर्चा होत आहे. आता त्याच्या किंमतीबाबत जी माहिती समोर आली आहे, ती जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
शाहरुख खानने त्याच्या बंगल्याबाहेर जी नेम प्लेट लावली आहे त्याची किंमत लाखोंमध्ये असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, किंग खानच्या बंगल्याच्या नेम प्लेटची किंमत 20 ते 25 लाखांच्या आसपास आहे. मन्नतच्या नेम प्लेटची संपूर्ण रचना गौरी खानच्या (Gauri Khan) देखरेखीखाली करण्यात आली आहे.
New Nameplate🥺♥#ShahRukhKhan #Mannat pic.twitter.com/m3twdfLFNC
— Latif SRKian✨ (@LatifSrkian) April 22, 2022
शाहरुख खानच्या घरातील मन्नतची नेम प्लेट पहिल्यांदाच बदललेली नाही. याआधीही अनेकवेळा नेम प्लेट बदलण्यात आली आहे. मन्नतच्या फोटोच्या एकूण 4 नेम प्लेट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता चाहते मन्नतच्या नवीन नेमप्लेटसह फोटो शेअर करत आहेत.
शाहरुखने नवीन चित्रपटाची घोषणा केली
शाहरुख खानने नुकतीच त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. त्याच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) करणार आहेत. शाहरुखच्या नव्या चित्रपटाचे नाव '(Dunki)'आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)