Shahid Kapoor : बहीण सनाच्या लग्नात शाहीद कपूरची पत्नी मीरासोबत धमाल, चाहत्यांकडून फोटोवर कमेंट्सचा वर्षाव
अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि वहिनी मीरा कपूर (Mira Kapoor) यांनी सना कपूर हिच्या लग्नात खूप धमाल केली आहे. शाहिदने आपल्या इन्स्टाग्रामवर या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.
Shahid Kapoor : अभिनेते पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी सना कपूर 2 मार्च रोजी प्रियकर मयंक पाहवासोबत विवाह बंधनात अडकली. सना आणि मयंकच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. या लग्नात सावत्र भाऊ अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि वहिनी मीरा कपूरहीने (Mira Kapoor) खूप धमाल केली आहे. या विवाहासोबतच शाहिद आणि मिराचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.यामध्ये शाहिद पत्नी मीरासोबत मजेदार पोज देताना दिसत आहे.
शाहिदनेही त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये शाहिद आणि पत्नी मीरा दोघेही जीभ बाहेर काढताना आणि मजेदार पोज देताना दिसत आहेत.या जोडीचा हा फोटो खूपच क्यूट आणि फनी आहे. चाहत्यांनी या फोटोला चांगलीच पसंती दिली आहे. हा फोटो शेअर करत शाहिद कपूरने कॅप्शनमधून, 'कोणाची जीभ जास्त लाल आहे?'असा प्रश्न विचारला आहे.
View this post on Instagram
शाहिद कपूरने आपल्या बहिणीच्या लग्नात काळ्या रंगाची बांधगला शेरवानी परिधान केली होती. त्याच्यासोबत मुलगा जैनही यानेही काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर मीरा आयव्हरी कलरच्या साडीमध्ये खूपच क्लासी दिसत होती.
मीराने या लग्नात जास्त मेकअप केला नव्हता. शाहिदने हाच फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेक वेळा शाहिद कपूर आणि मीरा कपूर हे जोडपे चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेत असतात. त्यांच्या आताच्या फोटोनेही चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचा आज विशेष भाग, यश नेहाला डिनरडेटवर नेणार
- Jhund : आमिर खाननं सूचना दिली अन् अमिताभ बच्चन 'झुंड'मध्ये काम करण्यास तयार झाले!
- Rang Majha Vegla : लेकीची माफी मागणार राधा आई, होळीत होणार का दीपा-कार्तिकची दिलजमाई?
- Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील नव्या ट्विस्टची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले...