Shahid Kapoor : नाकावर जखम, डोळ्यात आग; शाहिद कपूरच्या 'ब्लडी डॅडी'चं पोस्टर आऊट
Shahid Kapoor : शाहिद कपूरच्या 'ब्लडी डॅडी' (Bloody Daddy) या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
Shahid Kapoor Bloody Daddy First Look Poster Out : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या चर्चेत आहे. त्याच्या आगामी 'ब्लडी डॅडी' (Bloody Daddy) या सिनेमाचं पोस्टर आता आऊट झालं आहे. या पोस्टरमध्ये शाहिदचा एक वेगळा अवतार पाहायला मिळत आहे.
शाहिदच्या 'ब्लडी डॅडी'चं पोस्टर आऊट!
शाहिद कपूरने सोशल मीडियावर 'ब्लडी डॅडी' या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये शाहिद कपूर खूपच रागात दिसत आहे. नाकावर जखम, डोळ्यात आग आणि शर्टावर रक्ताचे डाग असा काहीसा शाहिदचा लूक आहे. पोस्टर शेअर करत शाहिदने लिहिलं आहे,"ब्लडी डॅडी'चा टीझर लवकरच आऊट होईल".
View this post on Instagram
शाहिदच्या 'ब्लडी डॅडी'चं पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अली अब्बास जफरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'ब्लडी डॅडी' या सिनेमाआधी अली अब्बास जफरने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या 'सुलतान' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आता 'ब्लडी डॅडी' या सिनेमातील शाहिदच्या लुकचं प्रचंड कौतुक होत आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'ब्लडी डॅडी'!
'ब्लडी डॅडी' हा शाहिदचा थरार नाट्य असणारा सिनेमा आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या सिनेमात रोनित रॉय, संजय कपूर, डायना पेंटी आणि विवान भतेना महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'ब्लडी डॅडी' सिनेमाचं पोस्टर शेअर करत रोनितने लिहिलं आहे,"या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच मी खूप उत्सुक होतो. आता हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने माझी उत्सुकता आणखी वाढली आहे". 'ब्लडी डॅडी' हा सिनेमा 2011 साली प्रदर्शित झालेल्या 'Nuit Blanche' या फ्रेंच सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.
'ब्लडी डॅडी' या सिनेमाआधी शाहिद कपूर (Shahid Kapoor) 'फर्जी' (Farzi) या वेबसीरिजमध्ये दिसून आला होता. या सीरिजमध्ये त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. राज आणि डीके दिग्दर्शित या सीरिजमध्ये शाहिद कपूरने सनी हे पात्र साकारलं होतं. या सीरिजमधील विजय सेतुपती आणि राशी खन्नाच्या अभिनयाचंदेखील कौतुक झालं होतं.
संबंधित बातम्या