King Movie : मेगास्टारचा मुलगा किंग खानच्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत, सुहाना खानही झळकणार
Shah Rukh Khan Upcoming Movie King : शाहरुख खानच्या किंग चित्रपटात आणि मुलगी सुहाना खान झळकणार आहे.
![King Movie : मेगास्टारचा मुलगा किंग खानच्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत, सुहाना खानही झळकणार Shah Rukh Khan Upcoming Movie King Abhishek Bachchan will be seen in third time on big screen AB s negative role marathi news King Movie : मेगास्टारचा मुलगा किंग खानच्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत, सुहाना खानही झळकणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/16/983a0c799f0361211d8e60e85a7939cc1721134012609322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या आगामी किंग (King Movie) चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचं सध्या लंडनमध्ये चित्रीकरण सुरु आहे. अलिकडे शाहरुख खान या चित्रपटाच्या शूटिंगमधून वेळ काढून मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला पोहोचला होता. या चित्रपटाचं शूटिंग पुन्हा एकदा सुरु झालं असून या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मेगास्टारचा मुलगा शाहरुख खानच्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) 'किंग' चित्रपटात विलनच्या भूमिकेत दिसणार आहे.
मेगास्टारचा मुलगा शाहरुख खानच्या चित्रपटात खलनायक
शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याची मुलगी सुहाना खान देखील या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'किंग' चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिषेक बच्चनची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटात अभिषेक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खान सध्या लंडनमध्ये किंग चित्रपटाचं शूटिंग करत आहे.
अभिषेक बच्चन किंग चित्रपटात विलनच्या भूमिकेत
किंग चित्रपटात अभिषेक बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. किंग चित्रपटाचं दिग्दर्शन सुजॉय घोष करत आहे. हा चित्रपट 2025 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
View this post on Instagram
किंग चित्रपटात सुहाना खानही झळकणार
2024 मध्ये शाहरुख खानचा कोणताही चित्रपट मोठ्या पडद्यावर आलेला नाही, त्यामुळे त्याचं चाहते काहीसे नाराज आहे. आता किंग खानच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. शाहरुख खान आणि सुहाना खान स्टारर किंग चित्रपटाचं शूटिंग गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालं आहे. मिडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक सुजॉय घोष ॲक्शनपॅक थ्रिलर किंग चित्रपटाचे शूटिंग सध्या लंडनमध्ये सुरु आहे.
बॉलिवूड शाहरुख खानसाठी 2023 हे वर्ष खूप ब्लॉकबस्टर ठरलं. आधी 'पठाण' मग 'जवान', किंग खानच्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. यानंतर शाहरुख खाननेही राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' या चित्रपटाद्वारे बंपर कमाई केली. तर, शाहरुखची मुलगी सुहाना खाननेही झोया अख्तरच्या ओटीटीवर रिलीझ झालेल्या 'द आर्चिज' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आता शाहरुख खान आणि सुहाना खान सुजॉय घोषच्या 'किंग' चित्रपटात एकत्र काम करणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Rakul Preet Singh : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या भावाला ड्रग्स प्रकरणात अटक, 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, अमनसह पाच जण तुरुंगात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)