Shah Rukh Khan Net Worth : सलमान, आमीरपेक्षाही संपत्तीच्या बाबतीत शाहरुख ठरतो सरस; बंगला, महागड्या गाड्या अन् बरंच काही
Shah Rukh Khan : शाहरुख खानची गणना बॉलिवूडच्या सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत केली जाते.
Shah Rukh Khan Richest Celebs in Bollywood : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडला अनेक ब्लॉक बस्टर सिनेमे दिले आहेत. सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खानच्या (Aamir Khan) तुलनेत किंग खान मात्र कमाईच्या बाबतीत आघाडीवर आहे. जाणून घ्या बॉलिवूडच्या बादशाहची एका दिवसाची कमाई किती आहे...
शाहरुख खान सर्वात श्रीमंत!
मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी आहे. किंग खान एका दिवसाला 1.4 कोटी कमावतो. शाहरुख खानची एकूण संपत्ती 5 हजार 593 कोटी आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार, सलमान खान एका दिवसात सुमारे 1.01 कोटी कमावतो आणि त्याची एकूण संपत्ती 60 मिलियन डॉलर म्हणजेच 2900 कोटी रुपये आहे. आमिर खान दिवसाला सुमारे 33.47 लाख कमावतो आणि त्याची एकूण संपत्ती 1800 कोटी आहे. म्हणजेच शाहरुख खान सर्वात श्रीमंत आहे.
शाहरुख खानची देश-विदेशात प्रॉपर्टी
शाहरुख खानची प्रॉपर्टी देश-विदेशात आहे. त्याचं स्वतःचं 'रेड चिलीज' नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे. या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली त्याने अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे. तसेच तो कोलकाता नाईट रायडर्सचादेखील को-ऑनर आहे. मुंबईसह दुबईतही बादशाहची प्रॉपर्टी आहे.
एका जाहिरातीसाठी शाहरुख किती मानधन घेतो?
बायजू आणि किडजानिया या कंपन्यांमध्ये देखील शाहरूखची गुंतवणूक आहे. पेप्सी, व्हर्लपूल, नोकिया, हुंडई, टॅग ह्यूअर, डिश टीवी, बिग बास्केट आणि बायजूस अशा बड्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्येदेखील शाहरूखने काम केलं आहे. रिपोर्टनुसार एका जाहिरातीसाठी तो 3.5 से 4 करोड रुपये मानधन घेतो.
शाहरूखची वार्षिक कमाई 38 मिलियन म्हणजेच जवळपास 284 करोड रूपये आहे. शाहरूखने त्याच्या करिअरची सुरूवात फौजी आणि सर्कस यांसारख्या मालिकांमधून केली. त्यानंतर त्याने कौन बनेगा करोडपती- सिझन 3 आणि क्या आप पंचवी पास से तेज है या शोचे सुत्रसंचालन देखील केले आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, 2011मध्ये शाहरूखने 'झटका: टोटल वाइपआउट' या शोसाठी 2.5 करोड रुपये मानधन घेतले होते.
महागड्या गाड्यांचा ताफा
शाहरुखच्या मन्नत या घराची किंमत 400 कोटी आहे. किंग खानच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये एकाहून एक सरस आलिशान गाड्यांचा समावेश आहे. शाहरुखकडे Bugatti Veyron, BMW 6 Series, Mitsubishi Pajero, BMW 7 Series Car, Audi A6, Land Cruiser, Rolls Royce Drop Hate Coupe अशा लक्झरी गाड्या आहेत.
संबंधित बातम्या