एक्स्प्लोर

वाढदिवसाची पार्टी रंगली, टिश्यू पेपरवरून वाद अन् अल्पवयीन तरुणांनी दारूची बाटली डोक्यात फोडत ...लातूरच्या रिंगरोड परिसरात धक्कादायक घटना

रिंगरोडवरील धाब्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्यप्राशन, गोंधळ आणि भांडणं होणं नित्याचं झालं आहे. अनेक युवक, व्यापारी, विद्यार्थी येथे मद्यप्राशनासाठी गर्दी करत असतात.

Latur Crime: लातूर शहराच्या रिंगरोडवरील एका धाब्यावर वाढदिवस साजरा करताना टिश्यू पेपरवरून दोन गटांमध्ये सुरू झालेला वाद थेट जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अल्पवयीन मुलाने दारूच्या बॉटलने तोंड ठेचल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, या गोंधळात अनेक अल्पवयीन तरुणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेमका प्रकार काय?

लातूर शहरातील रिंगरोडवरील ढाब्यावर रात्रीच्या वेळी मद्यपींची मोठी गर्दी असते. यातूनच दोन टेबलवर दारू पीत बसलेल्या तरुणांमध्ये भांडण सुरू झाले आणि धाब्यावरील भांडण रस्त्यावर आले. दारूची बॉटल डोक्यात घालून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना रात्री  घडली..ही सर्व हाणामारी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली.. धक्कादायक बाब ही यात अल्पवयीन मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता...

रिंगरोडवरील आठवण धाब्यावर दीपक सूर्यवंशी ( रा.  कोंडदेव नगर लातूर) आणि संगमेश्वर काळगे ( रा. खणी लातूर) हे दोघे त्याच्या मित्रांबरोबर दारू पीत आणि जेवण करत बसली होते... त्यांच्या समोरच्या टेबलवर आणखीन काही तरुण बसले होते. वाढदिवसाची पार्टी सुरू होती. वेटरला टिशू पेपर मागण्यात आला.. वेटरला वेळोवेळी जोरात आवाज देण्यात येत होता.. आजू बाजूला बसलेल्या या दोन टेबलवरील तरुणांमध्ये मोठ-मोठ्याने बोलण्यावरून वाद निर्माण झाला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद थेट रस्त्यावर आला. यामध्ये दीपक आणि संगमेश्वरच्या डोक्यात दोघांनी दारूची बॉटल घातल्याने ते जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. 

पोलिसांचा तपास सुरु

या प्रकारात सहभागी असलेल्यांमध्ये अल्पवयीनांची मोठी संख्या असल्याने पालकांमध्येही चिंता पसरली आहे. रिंगरोडवरील धाब्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्यप्राशन, गोंधळ आणि भांडणं होणं नित्याचं झालं आहे. अनेक युवक, व्यापारी, विद्यार्थी येथे मद्यप्राशनासाठी गर्दी करत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या हिंसक घटनांना वेळोवेळी तोंड द्यावं लागतं.घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील मोठा अनर्थ टळवला. पोलिसांनी मारहाणीचा व्हिडिओ ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget