एक्स्प्लोर
Shefali Jariwala Death: चेहऱ्यावर वेदना, हातात पत्नीचा फोटो; शेफाली जरीवालावर रुग्णालयात शवविच्छेदन सुरु असताना पती पराग पहिल्यांदाच आला समोर
Shefali Jariwala Death: काँटा लगा गर्ल' आणि 'बिग बॉस 13' मधील स्पर्धक शेफाली जरीवाला (42) हिचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे.
Shefali Jariwala Death
1/10

Shefali Jariwala Death: 'काँटा लगा गर्ल' आणि 'बिग बॉस 13' मधील स्पर्धक शेफाली जरीवाला (42) हिचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन (Shefali Jariwala Death) झालं आहे. (Photo Credit- Shefali Jariwala)
2/10

काल (28) रात्री अचानक शेफाली जरीवालाची तब्येत बिघडली. त्यानंतर तिला अंधेरीतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी शेफाली जरीवालाला मृत घोषित केलं. बिग बॉस आणि काँटा लगा या गाण्यानं शेफालीला प्रसिद्धी मिळवून दिली होती. (Photo Credit- Shefali Jariwala)
3/10

शेफाली जरीवालाचा पार्थिव आता कूपर रूग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलं आहे. तिचे कुटुंबीय सध्या कूपर रुग्णालयात दाखल झालेत. तिचा मृत्यूचं नेमकं असं कारण समोर आलेलं नाही. (Photo Credit- Shefali Jariwala)
4/10

सकाळी फॉरेन्सिक विभागाच्या टीमनं तिच्या घरी तपास केला. त्यानंतर तिचा पती पराग त्यागीसह चार जणांना जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.(Photo Credit- Shefali Jariwala)
5/10

शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागीनं मीडियाशी बोलण्यास नकार दिलाय. अंधेरीतील त्याचं निवासस्थान असलेल्या इमारतीखाली माध्यमांनी सवाल उपस्थित केले असता पराग त्यागीनं बोलणं टाळलं.(Photo Credit- Shefali Jariwala)
6/10

शेफालीच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागी पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला. यावेळी त्याचा चेहरा पडलेला होता. पराग खूप हताश आणि निराश दिसत होता. दरम्यान, यादरम्यान पराग त्याच्या पाळी कुत्रा घेऊन बाहेर जाताना दिसला. यावेळी त्याच्या हातात पत्नी शेफालीचा फोटोही दिसून आला.(Photo Credit- Shefali Jariwala)
7/10

शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर आलीये. शेफाली गेल्या 15 वर्षांपासून मिरगीचा त्रास होता. तिच्यावर उपचार देखील सुरू होते. (Photo Credit- Shefali Jariwala)
8/10

फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिची मेडिकल रिपोर्ट देखील ताब्यात घेतलीये. तसंच शेफाली ५ ते ६ वर्षांपासून तरूण दिसण्यासाठी उपचार घेत होती. शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती दिलीये.(Photo Credit- Shefali Jariwala)
9/10

शेफाली अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत होती. या उपचारादरम्यान ती दोन प्रकारच्या गोळ्या घेत असल्याचं कळतंय. मात्र शेफाली घेत असलेल्या औषधांचा हृदयविकाराशी संबंध नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. (Photo Credit- Shefali Jariwala)
10/10

शेफाली निरोगी होती आणि तिने कुठवल्याही आजाराची माहिती दिली नाही, असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे.(Photo Credit- Shefali Jariwala)
Published at : 28 Jun 2025 02:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
भारत
क्रिकेट


















