Aaditya Thackeray: समृद्धी महामार्गाची पावसाळ्यात नदी झाली, कोण हाॅटेल घेतोय, ज्वलंत हिंदुत्व म्हणजे भुमरेंचा ड्रायव्हर 150 कोटींची सालारजंगची संपत्ती घेतोय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Aaditya Thackeray: मुंबई पुणे महामार्गावर साडे साडेबारा कोटी रुपये चुकीचा फाईन लावण्यात आला आहे. हा घोटाळा एमएसआरडीसीने केलेला आहे. असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Aaditya Thackeray मुंबई: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे तेच मंत्री आहेत जे त्यांच्या शाळेत हिंदी विषय लागण्यासाठी सक्ती केली होती. महाराष्ट्रात त्याच्या अमलबजावणी चा जीआर देखील त्यांनी काढला होता. हे तेच दादा भुसे आहेत जे आमच्या कडे असताना आम्हाला कृषी खातं नको, दुसरं काही तरी द्या म्हणून मागे लागले होते. आणि हेच ते दादा भुसे आहे ज्यांनी गेल्या दीड वर्षांपासून एमएसआरडीसी खातं सांभाळलं. त्यातच घोटाळा झाला आहे. त्याचं प्रमाणे समृद्धी महामार्गाची (Samruddhi Mahamarg) नदी झाली होती.
म्हणजे ज्या महामार्गाला माझ्या आजोबांचा म्हणजेच वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलं त्या महामार्गावर आज खड्डे पडले आहेत. त्याचं महामार्गावर आज नदी वाहते आहे. आणि आजची बातमी आहे. मुंबई-पुणे महामार्गावर चुकीच्या पद्धतीने जवळ जवळ साडे साडेबारा कोटी रुपये चुकीचा फाईन लावण्यात आला आहे. कारण हा घोटाळा एमएसआरडीसी ने केलेला आहे. असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला आहे. महाविकास आघाडीची आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप राज्यात महाराष्ट्र विरोधातील अजेंडा चालवतंय- आदित्य ठाकरे
हा घोटाळा एवढ्यावरच सीमित नसून माझी गेल्या 3 ऑक्टोंबर ची पत्रकार परिषद आठवत असेल तर, एमएसआरडीसी, एमएमआरडिसी, डायलोग ठाणे उन्नत महामार्ग घोटाळा हे सगळे घोटाळे लाडक्या कॉन्ट्रॅक्टर योजनेमधून झाले आहेत. असं ही आदित्य ठाकरे म्हणाले. गेल्या पाच वर्षात भाजपचे सरकार असो किंवा मिंधे चं सरकार असो आपण पाहतोय की अनेक प्रकल्प हे गुजरातला गेले आहेत. त्यातच आता मराठीत बोलायची गरज गरज नाही आम्ही सांगू त्याचं भाषेत बोलावं लागेल, अशी दादागिरी भाजपचे लोक कसे करू शकतात? मुळात या विषयाची काही गरजच नव्हती. शाळेत आपापल्या परीने वेगवेगळे विषय शिकवले जात असतात. मग मराठीवर तिसऱ्या भाषेची सक्ती कशासाठी? चा कुठल्याही भाषेला विरोध नाही मात्र पहिलीच्या विद्यार्थ्यांवर तुम्ही तिसरी भाषा लाभणार आहात का हा विचार शिक्षण मंत्र्यांनी करायला पाहिजेत, एकंदरीत महाराष्ट्र विरोधातील अजेंडा भाजप राज्यात चालवत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला आहे.
मुंबईच्या धारावीमध्ये जगातला सर्वात मोठा घोटाळा- आदित्य ठाकरे
मुंबईमध्ये जगातला सर्वात मोठा घोटाळा धारावी मध्ये झाला आहे. धारावीचा अदानी घोटाळा हा तेवढ्याच साठी झाला आहे कारण राजकीय दृष्ट्या मुंबई जिंकू शकत नाही. म्हणुन मुंबईची जमीन अदानीच्या घशात घातली आणि इथले प्रकल्प गुजरातला नेलेत. याला आम्ही सर्व राजकीय हेवेदावे विसरून कडाडून विरोध करू असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या






















