1995 मधली 'ती' ब्लॉकबस्टर फिल्म, जी शाहरुखनं 4 वेळा केलेली रिजेक्ट; पण नंतर होकार दिला अन् बॉक्स ऑफिस गाजवलं, रिलीज होताच केलेला 102 कोटींचा गल्ला
DDLJ Interesting Facts: शाहरुख खान म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. पण, तुम्हाला माहितीय का? शाहरुखनं त्याचा एक सुपरडुपर हिट चित्रपट तब्बल चार वेळा नाकारलेला...

DDLJ Interesting Facts: बॉलिवूडचा किंग... शाहरुख खान (Shahrukh Khan). असं म्हटलं जातं की, शाहरुख ज्या सिनेमात झळकतो, त्या सिनेमाचं सोनं होतं. शाहरुखचे केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात चाहते आहेत. आपला अभिनय, इमोशन्सनी शाहरुखनं अनेकांची मनं जिंकलीत. अभिनेत्याचे असेही काही चित्रपट आहेत, दे रिलीज होऊन अनेक वर्ष उलटली आहेत. पण, आजही ते चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. असाच एक चित्रपट, जो 1995 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात काम करण्यासाठी शाहरुख खाननं तब्बल 4 वेळा नकार दिला. पण, त्यानंतर शाहरुखनं तो चित्रपट केला अन् रिलीज होताच या चित्रपटानं थिएटरमध्ये धुमाकूळ घातला. आजही तो चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासाठी चाहत्यांच्या उड्या पडतात.
शाहरुखनं चार वेळा रिजेक्ट केलेला चित्रपट कोणता?
शाहरुख खाननं जो चित्रपट 4 वेळा रिजेक्ट केला होता, त्याचं नाव 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (Dilwale Dulhania Le Jayenge). हो... तुम्ही बरोबर ऐकताय, शाहरुख खान आणि काजोलचा आजवरचा सर्वात हिट चित्रपट, जो आजही थिएटरमध्ये रुपेरी पडद्यावर झळकतो, तो चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' शाहरुख खाननं तब्बल तिनदा रिजेक्ट केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खाननं स्क्रिप्ट ऐकल्यानंतर DDLJ मधील राजच्या भूमिकेसाठी आपण फारच मोठे आहोत, असं म्हणत चारदा चित्रपट नाकारला होता. पण, नंतर दिग्दर्शक, निर्मात्यांनी घातलेली गळ आणि इतर काही कारणास्तव शाहरुख खान DDLJ करायला तयार झाला. त्यानंतर शाहरुख आणि कोजलनं रुपेरी पडद्यावर साकारलेली राज आणि सिमरनची जोडी आजही प्रेक्षकांची मनं जिकंते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खाननं ज्यावेळी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं, त्यावेळी त्याला रोमँटिक भूमिका साकारायची नव्हती. त्याला वाटायचं की, त्याचं वय रोमँटिक रोल्ससाठी खूपच जास्त आहे. पण, शाहरुखनं त्या भूमिका स्विकारल्या आणि पुढे जाऊन चाहत्यांना त्या एवढ्या भावल्या की, त्यांनी त्याला रोमांसचा किंग टॅग बहाल केला.
View this post on Instagram
DDLJ ची पहिली पसंत कोण?
आदित्य चोपडा यांना दिल वाले दुल्हनिया ले जायेंगेमध्ये टॉम क्रूजला मुख्य भूमिकेत पाहायचं होतं. त्यानंतर सैफ अली खानला देखील ही मूव्ही ऑफर करण्यात आली होती. पण, सैफ अली खाननं या चित्रपटात काम करण्यास मनाई केली. शेवटी शाहरुख खाननं राजची भूमिका साकारण्यास होकार दिला. या चित्रपटात शाहरुखला देण्यात आलेलं 'राज' हे नाव दिग्गज अभिनेते राज कपूर यांना इंस्पायर होऊन देण्यात आलं होतं.
फिल्मचं बजेट अन् कमाई किती?
फिल्म 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' बनवण्यासाठी 40 लाखांचा खर्च आला होता. तर, या फिल्मनं तब्बल 102 कोटींहून जास्त कमाई केली होती. 1995 मध्ये 102 कोटींची कमाई करणं म्हणजे, फार मोठी झेप होती. त्यामुळे आजही हा चित्रपट थिएटरमध्ये दाखवला जातो. आणि प्रेक्षकही आजही हा चित्रपट तेवढ्याच आवडीनं बघतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























