एक्स्प्लोर

Blockbuster Film Of 2025: 64 वर्षांच्या हिरोचा जलवा; हादरवून सोडलं बॉक्स ऑफिस; 2025 ची पहिली ब्लॉकबस्टर ठरली 'ही' फिल्म

Blockbuster Film Of 2025: सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबाती यांचा तेलुगू चित्रपट 'संक्रान्तिकी वास्तुनम' नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं इतिहास रचला आहे.

Blockbuster Film Of 2025: नव्या वर्षाचा दुसरा महिना सुरू झाला आणि 2025 वर्षातला पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट मिळाला आहे. यापूर्वी 'पुष्पा 2'नं (Pushpa 2) 2024 सोबतच 2025 वर्षही गाजवलं. पण अखेर पुष्पाचं वादळ क्षमलं असून 64 वर्षांच्या अभिनेत्याच्या चित्रपटानं धुमाकूळ घातला आहे. अवघ्या तीन आठवड्यांत या चित्रपटानं त्याच्या भांडवलापेक्षा तब्बल 6 पटींनी जास्त कमाई करून इतिहास रचला आहे. आतापर्यंत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) तब्बल 300 कोटींची कमाई केली आहे.

आता तुम्ही म्हणाल, हा कुणी बॉलिवूड सुपरस्टारचा चित्रपट असेल. पण नाही... हा चित्रपट साऊथ सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबातीचा तेलुगू चित्रपट 'संक्रान्तिकी वास्तुनम' (Sankranthiki Vasthunam) आहे. या तेलगु चित्रपटानं (Telugu Movies) बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घातला आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं इतिहास रचला आहे. केवळ देशातच नाहीतर, परदेशातही 'संक्रान्तिकी वास्तुनम' मोठ्या थाटात कमाई करत आहे. 

सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबाती (Daggubati Venkatesh) यांचा तेलुगू चित्रपट 'संक्रान्तिकी वास्तुनम' नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं इतिहास रचला आहे. केवळ देशातच नाही तर, परदेशातही 'संक्रान्तिकी वास्तुनम'ची कीर्ती पसरत आहे. 2025 सालचा हा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट असल्याचं सिद्ध झालं आहे, हे आश्चर्यकारक आहे. अवघ्या तीन आठवड्यात चित्रपटाच्या कलेक्शननं 300 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. 'संक्रान्तिकी वास्तुनम'नं आतापर्यंतची किती कमाई केली, ते सविस्तर जाणून घेऊयात...

'संक्रान्तिकी वास्तुनम'नं आतापर्यंतची कमाई किती?

वेंकटेशचा 'संक्रान्तिकी वस्थुनम' गेल्या महिन्यात 14 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा एक अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट आहे, ज्यामध्ये कॉमेडीचा चांगला डोसही प्रेक्षकांना मिळतो. या चित्रपटाच्या कथेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि म्हणूनच बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 20 दिवसांत या चित्रपटानं जगभरात 303 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

भांडवलापेक्षा 6 पटींनी जास्त कमाई 

आयएमडीबीच्या रिपोर्टनुसार, 'संक्रान्तिकी वास्तुनम' तयार करण्यासाठी तब्बल 50 कोटींचा खर्च आला आहे. आतापर्यंत फिल्मनं भांडवलापेक्षा तब्बल 6 पटींनी अधिक कमाई केली आहे. ज्या वेगानं चित्रपट कमाई करत आहे, त्यातून चित्र स्पष्ट होतंय की, ही फिल्म लवकरच 350 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल. 

देशभरात बक्कळ कमाई 

ट्रेड वेबसाईट सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'संक्रान्तिकी वास्तुनम' चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 174.10 कोटी रुपयांचा बिजनेस केला आहे. फिल्मच्या कमाईचे हे आकडे गेल्या 21 दिवसांतले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Venkatesh Daggubati (@venkateshdaggubati)

'संक्रान्तिकी वास्तुनम'ची कहाणी काय? 

'संक्रान्तिकी वास्तुनम'ची कहाणी एक लग्न झालेल्या जोडप्याच्या अवतीभोवती फिरते. हे जोडपं आपलं आयुष्य अगदी आनंदात जगत असतं. पण, ट्वीस्ट तेव्हा येतो, जेव्हा हिरोची एक्स गर्लफ्रेंड पुन्हा त्याच्या आयुष्यात येते. त्यानंतर आनंदानं आयुष्य जगणाऱ्या जोडप्याचं संपूर्ण आयुष्य उलट-सुलट होतं. फिल्ममध्ये 64 वर्षांच्या वेंकटेंशचे जबरदस्त अॅक्शन सीन्सही पाहायला मिळतात. 

'संक्रान्तिकी वास्तुनम'ची स्टार कास्ट 

दरम्यान, 'संक्रान्तिकी वास्तुनम'चे दिग्दर्शक अनिल आहेत. यामध्ये व्यंकटेश यांच्याव्यतिरिक्त मीनाक्षी चौधरी, ऐश्वर्या राजेश, उपेंद्र लिमये, साई कुमार आणि वीटीवी गणेश यांसारखे सेलिब्रिटी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ZEE5 नं या चित्रपटाचे डिजिटल राईट्स विकत घेतले आहेत. थिएटरनंतर, हा चित्रपट लवकरच ओटीटीवर देखील प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Director Taunt Kareena Kapoor: 21 कोटींचं मानधन घेते, तरीसुद्धा सिक्योरिटी अन् फुल-टाईम ड्रायव्हर अफॉर्ड करु शकत नाही; दिग्गज दिग्दर्शकाचा करिनाला सणसणीत टोला

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
TV Actor Arrest:16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
OTT Action Thriller: 3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Embed widget