Jawan : शाहरुख खानच्या 'जवान'ची रिलीज डेट पुढे ढकलली; आता 'या' महिन्यात होणार प्रदर्शित
Jawan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी 'जवान' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली असल्याचे म्हटले जात आहे.
![Jawan : शाहरुख खानच्या 'जवान'ची रिलीज डेट पुढे ढकलली; आता 'या' महिन्यात होणार प्रदर्शित Shah Rukh Khan Jawan movie Release Date know Shah Rukh Khan latest update Jawan : शाहरुख खानच्या 'जवान'ची रिलीज डेट पुढे ढकलली; आता 'या' महिन्यात होणार प्रदर्शित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/57dcf2e63e4e4b803d70cc3c09e92ba51678860159834254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shah Rukh Khan Jawan Release Date : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. देशासह परदेशात या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची क्रेझ अजूनही कायम आहे. दरम्यान चाहते त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली असल्याचे म्हटले जात आहे.
'जवान' कधी होणार रिलीज? (Jawan Release Date)
'जवान' (Jawan) हा शाहरुखचा यावर्षातला दुसरा बिग बजेट सिनेमा आहे. अनेक सुपरहिट दाक्षिणात्य सिनेमांचा दिग्दर्शक एटली (Atlee) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'जवान' या सिनेमाचे निर्माते आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा विचार करत आहेत. अद्याप या संदर्भात शाहरुख खान किंवा एटलीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सिने-विश्लेषक रमेश बाला यांनी ट्वीट करत 'जवान' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे, "एटली दिग्दर्शित शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा आता जूनमध्ये रिलीज होणार आहे. तर आता हा सिनेमा ऑक्टोबर 2023 मध्ये रिलीज होणार आहे".
#SRK - Dir #Atlee 's #Jawan release is being pushed from June to October..
— Ramesh Bala (@rameshlaus) March 15, 2023
शाहरुख खान झळकणार दुहेरी भूमिकेत
अॅक्शनचा तडका असलेल्या 'जवान' या सिनेमाच्या शूटिंगला 2022 मध्ये सुरुवात झाली आहे. या सिनेमात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. या सिनेमात शाहरुखसह विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
शाहरुखचे आगामी सिनेमे (Shah Rukh Khan Upcoming Movies)
'जवान' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याने शाहरुखचे चाहते नाराज झाले आहेत. 'जवान' या सिनेमानंतर शाहरुखचा 'डंकी' (Dunki) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुखसोबत तापसी पन्नू दिसणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमाचीही चाहत्यांना उत्सुकता आहे. शाहरुखच्या 'पठाण' (Pathaan) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केल्याने आता हे दोन सिनेमे किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या
Shah Rukh Khan : 'जवान'मधील 'तो' सीन लीक; अंगावर शहारे आणणारा शाहरुखचा अॅक्शन मोड
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)