Jawan Box Office Collection : शाहरुखच्या 'जवान'च्या कमाईत दिवसेंदिवस घसरण सुरुच; जाणून घ्या आतापर्यंतचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Jawan Movie : 'जवान' या सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस घसरण होत आहे.
Shah Rukh Khan Jawan Box Office Collection : शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टारर 'जवान' (Jawan) हा सिनेमा रिलीज रिलीज होण्याआधीपासूनच विविध कारणाने चर्चेत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या या सिनेमाच्या कमाईत आता घसरण पाहायला मिळत आहे. 'जवान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करेल, असे म्हटले जात होते. पण सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन खूपच निराशाजनक आहे.
'जवान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Jawan Box Office Collection)
'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी 'जवान'ने 75 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी, तिसऱ्या दिवशी 77.83 कोटी, चौथ्या दिवशी 80.1 कोटी, पाचव्या दिवशी 32.92 कोटी, सहाव्या दिवशी 26 कोटी, सातव्या दिवशी 23.2 कोटी आणि आठव्या दिवशी 18 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या आठ दिवसांत या सिनेमाने 386.28 कोटींची कमाई केली आहे.
- पहिला दिवस : 75 कोटी
- दुसरा दिवस : 53.23 कोटी
- तिसरा दिवस : 77.83 कोटी
- चौथा दिवस : 80.1 कोटी
- पाचवा दिवस : 32.92 कोटी
- सहावा दिवस : 26 कोटी
- सातवा दिवस : 23.2 कोटी
- आठवा दिवस : 18 कोटी
- एकूण कमाई : 386.28 कोटी
'पठाण'चा रेकॉर्ड मोडणार 'जवान'?
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता त्याचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'जवान' या सिनेमाने आतापर्यंत जगभरात 600 कोटींचा टप्पा पार केला आहे. दुसरीकडे 'पठाण' या सिनेमाने जगभरात 1050 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं आहे. त्यामुळे आता 'जवान' हा सिनेमा 'पठाण'चा रेकॉर्ड मोडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 'जवान' या सिनेमाने रिलीजच्या आठ दिवसांत 660 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता वीकेंडला पुन्हा एकदा हा सिनेमा चांगला गल्ला जमवेल असे म्हटले जात आहे.
'जवान' या सिनेमाचं दिग्दर्शन अॅटली कुमारने (Atlee Kumar) केलं आहे. तर गौरी खानने (Gauri Khan) या सिनेमाची निर्मिती केली आहे. 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. थरार-नाट्य असणाऱ्या 'जवान' या सिनेमात नयनतारा, विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर दीपिका पादुकोण आणि संजय दत्तची झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या