Jawan Box Office Collection Day 7: शाहरुखच्या 'जवान'ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट; सात दिवसात केली एवढी कमाई
Jawan Box Office Collection Day 7: 'जवान' चित्रपटानं सातव्या दिवशी किती कोटींची कमाई केली आहे? जाणून घेऊयात...
Jawan Box Office Collection Day 7: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटानं ओपनिंग-डेला बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. जवान हा चित्रपट भारतीय चित्रपटाच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. जवानाने पहिल्या दिवशी भारतात जवळपास 75 कोटी रुपयांची कमाई केली आणि जगभरात 125 कोटी रुपयांची कमाई केली.
जवान या चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 81 कोटींची कमाई केली. मात्र, रविवारनंतर चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. 'जवान'ने रिलीजच्या 7 व्या दिवशी किती कोटींची कमाई केली आहे? जाणून घेऊयात...
वीकडेजला जवान चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण झाली आहे. 'जवान' चित्रपटानं रविवारी 80.1 कोटींचा गल्ला जमवून इतिहास रचला, तर सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण झाली. सोमवारी या चित्रपटाने 32.92 कोटी रुपयांची कमाई केली होती. मंगळवारी 26 कोटी रुपयांची कमाई जवान या चित्रपटानं केली होती. आता रिलीजच्या 7 व्या दिवशी म्हणजेच बुधवारी चित्रपटानं 23 कोटींची कमाई केली आहे.
'जवान' चित्रपटाची सात दिवसांची एकूण कमाई आता 367.58 कोटींवर पोहोचली आहे. लवकरच हा चित्रपट 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
‘जवान’ हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा विजय सेतुपती, संजीता भट्टाचार्य, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक आणि आलिया कुरेशी रिद्धी डोगरा, सुनील ग्रोवर, मुकेश छाबरा, योगी बाबू आणि एजाज खान यांनीही काम केलं आहे. दीपिका पदुकोण आणि संजय दत्त यांचा या चित्रपटात कॅमिओ आहे.
जवान चित्रपटात शाहरुखचा डबल रोल आहे. आता जवान या चित्रपटानंतर शाहरुखचा डंकी हा चित्रपट रिलीज होणार आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. जवान आणि पठाण या चित्रपटांप्रमाणेच शाहरुखचा डंकी हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या: