Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'जवान'ने राष्ट्रीय चित्रपट दिनी केले दोन नवे रेकॉर्ड; बॉक्स ऑफिसवर केली कोट्यवधींची कमाई
Jawan : शाहरुख खानचा 'जवान' या सिनेमे दिवसेंदिवस नवनवे रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे.
![Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'जवान'ने राष्ट्रीय चित्रपट दिनी केले दोन नवे रेकॉर्ड; बॉक्स ऑफिसवर केली कोट्यवधींची कमाई Shah Rukh Khan Jawan Box Office Collection day 37 king khan records new earns National Cinema Day 2023 Bollywood Entertainment Latest Update Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'जवान'ने राष्ट्रीय चित्रपट दिनी केले दोन नवे रेकॉर्ड; बॉक्स ऑफिसवर केली कोट्यवधींची कमाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/14/39a6e13f5a6dc65c7ea7148815c0c1ef1697275902033254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shah Rukh Khan Jawan Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर नवनवे रेकॉर्ड करत आहे. बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करणाऱ्या या सिनेमाला राष्ट्रीय चित्रपट दिनाचा (National Cinema Day 2023) मोठा फायदा झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनी या सिनेमाने दोन नवे रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.
'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या 37 दिवसांनंतरही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. रिलीजच्या 37 व्या दिवशीही या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे.
राष्ट्रीय चित्रपट दिनी 'जवान'ने केले दोन रेकॉर्ड
राष्ट्रीय चित्रपट दिनी 'जवान' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. 'जवान' या सिनेमाने देशभरात 632.24 कोटींची कमाई केली आहे. 'जवान' हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे. जगभरात या सिनेमाने 1,125 कोटींची कमाई केली आहे. तर 'फुकरे 3','मिशन रानीगंज','द व्हॅक्सीन वॉर' आणि 'थँक्यू फॉर कमिंग' या सिनेमांनाही 'जवान'चा रेकॉर्ड ब्रेक करता आलं नाही.
View this post on Instagram
'जवान' हा रिलीजच्या 37 दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. आतापर्यंत कोणत्याही बॉलिवूड सिनेमाला 37 दिवसांत हा रेकॉर्ड ब्रेक करता आला नाही. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' आणि तिसऱ्या क्रमांकावर 'बधाई हो' चोथ्या क्रमांकावर 'दृश्यम 2' हा सिनेमा आहे.
'जवान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Jawan Box Office Collection)
'जवान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 389.88 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 136.1 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 55.92 कोटी, चौथ्या आठवड्यात 35.63 कोटी, पाचव्या आठवड्यात 9.71 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या 37 व्या दिवशी या सिनेमाने 5.4 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच भारतात (India) आतापर्यंत या सिनेमाने 632.28 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात (Worlwide) या सिनेमाने 1131.5 कोटींचा गल्ला जमवला आहे. शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा आता किती कोटींची कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या
National Cinema Day 2023: आज आहे राष्ट्रीय चित्रपट दिन; शाहरुखचा 'जवान' ते अक्षयचा 'मिशन रानीगंज', 99 रुपयांत पाहा 'हे' चित्रपट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)