Shah Rukh Khan : शाहरुखच्या वाढदिवशी 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; 34 मोबाईल फोन चोरीला
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या वाढदिवशी चाहत्यांनी 'मन्नत'बाहेर (Mannat) तुफान गर्दी केली होती. या गर्दीत चाहत्यांचे 34 मोबाईल फोन चोरीला गेले आहेत.
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) नुकताच 58 वा वाढदिवस साजरा झाला आहे. वाढदिवशी शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी 'मन्नत'बाहेर (Mannat) तुफान गर्दी केली होती. या गर्दीत चाहत्यांचे 34 मोबाईल फोन चोरीला गेले आहेत.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, शाहरुखच्या चाहत्यांचे गर्दीत 34 मोबाईल फोन चोरीला गेले आहेत.'मन्नत' बाहेर मोबाईल चोरी झाल्यानंतर चाहत्यांनी मुंबईतील वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. शाहरुखच्या वाढदिवशी हजारो चाहत्यांनी 'मन्नत'बाहेर मोठी गर्दी केली होती. मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली, नांदेड या ठिकाणांहून लोक एसआरकेला (SRK) वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
View this post on Instagram
'या' लोकांचे मोबाईल चोरीला
आलोक कुमार, अरबाज वाहिद खान, विनय वानखेडे, गुलाम कामरा, ध्रुव कोठारी, आयुष गाला, सुशील मोहिते, मंजीत तुफारकंती, संजय हलदर, अब्बास झागा, समीर इमाम, राज वोहरा, अल्काश ताडे, दिल सिंह, प्रिया राय आदि लोकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. शाहरुखच्या या सर्व चाहत्यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
मन्नतबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी; पोलिसांचा लाठी चार्ज
शाहरुख खान दरवर्षी वाढदिवसाला 'मन्नत'च्या गॅलरीत येऊन चाहत्यांची भेट घेत असतो. नेहमीप्रमाणे यंदाही त्याने गॅलरीत येत चाहत्यांची भेट घेतली आहे. मन्नतबाहेर मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना नियंत्रण मिळवण्यासाठी लाठी चार्ज करावा लागला.
शाहरुखच्या वाढदिवशी चाहत्यांना मनोरंजनाचा डबल धमाका
शाहरुखचा यंदाचा वाढदिवस खूपच खास होता. त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना मनोरंजनाचा डबल धमाका मिळाला आहे. शाहरुखच्या आगामी 'डंकी' (Dunki) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या सिनेमात किंग खान (King Khan) हार्दीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात शाहरुखसह तापसी पन्नू झळकणार आहे. तसेच शाहरुखचा 'जवान' (Jawan) हा सिनेमादेखील आता ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. 2023 हे वर्ष शाहरुखचं आहे. या वर्षात त्याचे 'पठाण' (Pathaan) आणि 'जवान' हा सिनेमे प्रदर्शित झाले. या सिनेमांनी जगभरातील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. आता 'डंकी' हा सिनेमा धमाका करण्यासाठी सज्ज आहे.
संबंधित बातम्या