Sardar Twitter Review: 'कांतारा' नंतर आता 'सरदार' ची चर्चा; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
सरदार (Sardar) हा स्पाय थ्रिलर चित्रपट काल (21 ऑक्टोबर) रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
Sardar Twitter Review: सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कांतारा हा कन्नड चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता कांतारा (Kantara) नंतर सरदार (Sardar) या तमिळ चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हा स्पाय थ्रिलर चित्रपट काल (21 ऑक्टोबर) रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. दिवाळीमध्ये रिलीज झालेला हा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
चित्रपटाची तगडी स्टार कास्ट
सरदार या चित्रपटात दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार कार्थी (Karthi), राशि खन्ना आणि चंकी पांडे यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे. या चित्रपटात अभिनेता कार्थीनं डबल रोल केला आहे. बाकी कलाकारांच्या भूमिरकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच 'सरदार'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जर या फेस्टिव्हल सीझनला तुम्ही कुटुंबासोबत चित्रपट पाहण्याचा प्लॅन करत असाल तर सरदार हा चित्रपट नक्की बघा, असे ट्विट्स सध्या नेटकरी शेअर करत आहेत. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'सरदार, दिवाळी विनर'
सरदार या चित्रपटाच्या कथानकापासून ते संगीत आणि कलाकारांच्या अभिनयापर्यंत सर्वंच गोष्टींचे कौतुक सध्या नेटकरी सोशल मीडियावर करत आहेत. पाहा युझर्सचे ट्विट्स:
If u love spy thriller u must go for this movie...Big treat👌#Sardar
— வழிப்போக்கன் (@sachin07332646) October 21, 2022
#Sardar Diwali Winner 🔥
— Paiyaa Naveen (@itsNaveen_M) October 21, 2022
#Sardar Review
— Kumar Swayam (@KumarSwayam3) October 21, 2022
POSITIVES:
1. #Karthi & Dual Roles Characterisation
2. Some Casting
3. Music & BGM
4. Direction
NEGATIVES:
1. Some Lags
2. Little Lengthy (Could have been trimmed for 10-15 mins)
Overall, #Sardarmovie is another success for #Karthi in 2022 😁#SardarReview pic.twitter.com/Gx4ERBoFjm
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेने या चित्रपटामधून साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे, तर अभिनेत्री लैला ही या चित्रपटामधून 16 वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: