एक्स्प्लोर
Advertisement
'लाइक मदर, लाइक डॉटर' ; सारा अली खानने शेअर केला आईसोबतचा फोटो
काही दिवसांपूर्वी सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा 'लव्ह आज कल2' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तसेच सारा वरूण धवनसोबत आगामी चित्रपट 'कुली नं. 1'मध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट 1 मे 2020मध्ये रिलीज होणार आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने 2018मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. तेव्हापासूनच सारा लाखो तरूणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. 'केदारनाथ', 'सिंबा', 'लव्ह आज कल 2' यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवणारी सारा सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. सारा नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशातच साराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आई अमृता सिंहसोबतचा एक कोलाज फोटो शेअर केला आहे.
आईसोबत कोलाज असलेला फोटो सारा अली खानने रविवारी आपल्या इन्स्टाग्राम आकाउंटवर शेअर केला. हा फोटो पाहिल्यानंतर सारा सेम टू सेम आपली आई अमृता सिंहची फोटोकॉपी असल्याचं लक्षात येतं. त्या दोघींमध्ये फरक ओळखणंही अवघड झालं आहे. अमृता सिंहने क्रिम कलरची साडी वेअर केली आहे. तर साराने पिंक कलरचा लेहेंगा वेअर केला आहे. दोघीही ट्रेडिशनल लूकमध्ये फार सुंदर दिसत आहे. सारा अली खानने फोटो शेअर करताना एक कॅप्शनही दिलं आहे. तिने लिहिलं आहे की, 'लाइक मदर, लाइक डॉटर' काही दिवसांपूर्वी सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा 'लव्ह आज कल2' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तसेच सारा वरूण धवनसोबत आगामी चित्रपट 'कुली नं. 1'मध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट 1 मे 2020मध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, सारा अली खानने 'केदारनाथ' या चित्रपटातून आपला बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंह राजपूत सोबत साराने स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर साराने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत 'सिंबा' या चित्रपटात काम केलं आहे. संबंधित बातम्या : 65th Amazon Filmfare Awards 2020: 'गली बॉय'ने पटकावला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा किताब, ही आहे पुरस्कारांची संपूर्ण यादी #BoycottFilmfareAwards : फिल्मफेयर फिक्स्ड असल्याचा नेटकऱ्यांचा दावा, बहिष्कार टाकण्याची मागणी तेजस चित्रपटाचा फर्स्ट लूक, कंगना फायटर पायलटच्या भूमिकेतView this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
फॅक्ट चेक
क्राईम
Advertisement