(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुरक्षारक्षकांची चूकी, साराला मागावी लागली माफी, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सध्या बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री असून लवकरचच तिचा अतरंगी रे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : बॉलीवुडमधील (Bollywood) आघाडीची अभिनेत्री सारा अली खान सद्या तिच्य आगामी अतरंगी रे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमार, धनुष आणि सारा अशी तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान सिनेमापूर्वीच सारा चर्चेत आली असून ती तिच्या विनम्रतेमुळे चर्चेत आली आहे. साराने तिच्या सुरक्षारक्षकांच्या उद्धट वागणूकीमुळे मीडियाची माफी मागितल्याची घटना मुंबईमध्ये घडली आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ instantbollywood या पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
का मागितली साराने माफी ?
साराचा आगामी चित्रपट अतरंगी रे मधील चकाचक हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून त्याच्याच लाँचिंगला सारा गेली होती. यावेळी साराचे फोटो घेण्यासाठीृ मोठ्या प्रमामात मीडियाने गर्दी केली होती. त्याचवेळी गर्दी जास्त झाल्याने साराच्या सुरक्षेसाठी तिच्या बॉडीगार्ड्सना काही मीडियाकर्मांना बाजूला करावं लागलं. यावेळी थोडा गोंधळ झाला होता. त्यामुळे सगळं झाल्यानंतर साराने सर्व मीडियाकर्मींची खास माफी मागितली तिचा हाच माफी मागतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तिचा हा साधा आणि विनम्र स्वभाव अनेक नेटकऱ्यांनाही भावला आहे.
पाहा व्हिडीओ
अतरंगी रे लवकर प्रेक्षकांच्या भेटीला
सारा अली खानचा आगामी 'अतरंगी रे' चित्रपच लवकरत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल रायने केले आहे. तर हिंमाशु शर्मा यांनी या सिनेमाचे लेखन केले आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष अनेक दिवसांनी हिंदी सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. ट्रेलरमधील सारा अली खान आणि धनुषच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सारा अली खानने अक्षय कुमारच्या भूमिकेबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहीले, "अतरंगी रे सिनेमात अक्षय कुमार अनोख्या अंदाजात एन्ट्री करणार आहे. मिस्टर अक्षयला भेटण्यासाठी तयार राहा.'
हे ही वाचा :
- 83 Trailer Release : अंगावर शहारे आणणारा '83' चा ट्रेलर प्रदर्शित; 1983च्या विश्व चषकाचा थरार
- Omicron : ओमिक्रॉन व्हेरियंटचा विकी-कतरिनाच्या लग्नाला फटका, घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
- Disha Patani : दिशा पाटनीनं केली प्लास्टिक सर्जरी? व्हिडीओ पाहून चाहते अवाक्
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha