एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बेळगावच्या मराठी तरुणाची शॉर्ट फिल्म ‘कान्स’मध्ये झळकणार
#505 या शॉर्टफिल्मची सिनेमॅटोग्राफी श्वेतप्रिया यांची आहे. चांगली आणि वाईट मनोवृत्तीच्या दोन व्यक्तीवर ही शॉर्टफिल्म बेतलेली आहे. शॉर्टफिल्ममध्ये नाट्यमयता आणि सस्पेन्स आहे.
बेळगाव : 6 मे रोजी होणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवात बेळगावच्या ‘#505’ या लघुपटाची शॉर्ट फिल्म कॉर्नर विभागात निवड झाली आहे.
या शॉर्ट फिल्मचे लेखन, दिग्दर्शन आणि संकलन संकेत कुलकर्णी यांनी केले आहे. यापूर्वीही संकेतने अनेक शॉर्टफिल्म केल्या आहेत. विविध विषय त्याने आपल्या शॉर्टफिल्ममधून हाताळले आहेत. बेळगावचेच कलाकार यापूर्वीच्या शॉर्टफिल्ममध्ये झळकले आहेत.
#505 या शॉर्टफिल्मची सिनेमॅटोग्राफी श्वेतप्रिया यांची आहे. चांगली आणि वाईट मनोवृत्तीच्या दोन व्यक्तीवर ही शॉर्टफिल्म बेतलेली आहे. शॉर्टफिल्ममध्ये नाट्यमयता आणि सस्पेन्स आहे.
संगीत निहार दाभडे यांनी दिले आहे.अभिजीत देशपांडे, ह्रिषिकेश सांगलीकर आणि सारांश मोहिते हे शॉर्टफिल्मचे कलाकार आहेत. यांची सचिन भट, सिद्धांत याळगी, अमित नेगान्धी, वृषाली नेगान्धी,चिन्मय शेंडे, दीपक होळी, विठ्ठल याळगी, नीता व प्रदीप कुलकर्णी यांचे शॉर्टफिल्मची निर्मितीसाठी सहकार्य लाभले आहे.
‘कान्स’सारख्या नावाजलेल्या चित्रपट महोत्सवात बेळगावचा लघुपट झळकणार आहे. त्यामुळे #505 च्या संपूर्ण टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शॉर्टफिल्मचे चित्रीकरण मुंबईत करण्यात आले आहे. आयलाईन्स पिक्चर्स बॅनरखाली शॉर्टफिल्मची निर्मिती करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement