एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'संजू' चित्रपटाचा तीनशे कोटींच्या क्लबमध्ये दणक्यात प्रवेश
सोळाव्या दिवशीच संजू या सिनेमाने तीनशे कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला.
मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ चित्रपटाने 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. 16 दिवसांमध्ये 'संजू'ने ही कामगिरी बजावली. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने भारतात बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले आहेत.
नॉन हॉलिडे किंवा सणासुदीच्या काळात प्रदर्शित झालेला नसतानाही संजू चित्रपटाने दमदार कामगिरी केली. संजूने दुसऱ्या दिवशी 50 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला, तर तिसऱ्याच दिवशी शंभर कोटींच्या. दीडशे कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी या सिनेमाला अवघे पाच दिवस लागले. सातव्या दिवशी दोनशे कोटी, दहाव्या दिवशी अडीचशे कोटी, तर 16 व्या दिवशी या सिनेमाने तीनशे कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला. चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
Non-holiday... Non-festival release... #Sanju crosses ₹ 300 cr mark... Now eyeing the *lifetime biz* of #BajrangiBhaijaan, #TigerZindaHai and #PK... Nett BOC... India biz... ALL TIME BLOCKBUSTER.
— taran adarsh (@taran_adarsh) July 15, 2018
आतापर्यंत भारतात पीके (2014), बजरंगी भाईजान (2015), सुलतान (2016), दंगल (2016), टायगर जिंदा है (2017) आणि पद्मावत (2018) या चित्रपटांनी तीनशे कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. बाहुबली 2 (हिंदी-2017) हा पाचशे कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा एकमेव चित्रपट आहे.#Sanju benchmarks... Crossed ₹ 50 cr: Day 2 ₹ 100 cr: Day 3 ₹ 150 cr: Day 5 ₹ 200 cr: Day 7 ₹ 250 cr: Day 10 ₹ 300 cr: Day 16 India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) July 15, 2018
राजकुमार हिरानी दिग्दर्शित संजू चित्रपट पहिल्याच दिवशी 34.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवत 2018 मधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला. बॉलिवूडच्या इतिहासात 'संजू' हा नॉन हॉलिडेला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. पहिल्या आठवड्यातील रविवारी 'संजू'ने 46.71 कोटींचा गल्ला जमवला होता. हिंदी सिनेमाच्या इतिहासात एका दिवसात इतकी कमाई करणारा हा पहिलाच सिनेमा आहे. अवघ्या तीन दिवसात या सिनेमाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. REVIEW : संजू : आयुष्यभराचा धडा पहिल्या सोमवारी 25.35 कोटींची कमाई करणारा हा पहिलाच सिनेमा ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सलमान खानच्या ‘रेस 3’ आणि संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’च्या नावावर होता. रणवीर कपूरची मुख्य भूमिका असलेला हा सर्वाधिक ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे. यापूर्वी रणवीरच्या चित्रपटांमध्ये 'बेशरम'ने पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली होती. राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'संजू' चित्रपटात रणबीर कपूर, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, करिष्मा तन्ना, महेश मांजरेकर अशी कलाकारांची फौज आहे.₹ 300 cr Club and its members...#PK [2014]#BajrangiBhaijaan [2015]#Sultan [2016]#Dangal [2016]#TigerZindaHai [2017]#Padmaavat [2018]#Sanju [2018] NOTE: #Baahubali2 [Hindi; 2017] is the ONLY film in ₹ 500 cr Club. NettBOC. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) July 15, 2018
संबंधित बातम्या :
'संजू'मध्ये रणबीरने असा साकारला संजय दत्त
चौथ्या दिवशीही 'संजू' सुसाट, एकूण कमाई...
'संजू'मध्ये कमली साकारणारा खरा कमलेश कोण?
'संजू'ची दुसरी बाजूही दाखवायला हवी : योगेश सोमण
'संजू' पाहिल्यानंतर संजय दत्त ढसाढसा रडला
'संजू'ने इतिहास रचला, रविवारी 'बाहुबली 2' चाही विक्रम मोडला
दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 'संजू'ची एकूण कमाई...
...जेव्हा सुटकेसाठी संजय दत्त बाळासाहेबांना शरण गेला होता!
'संजू' 2018 मधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement