Sanjay Raut: 'पठाण' मधील बेशरम रंग गाण्याच्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'शाहरुख खानचा चित्रपट म्हणून...'
शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पठाण (Pathaan) चित्रपटामधील बेशरम रंग या गाण्याच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Raut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील बेशरम गाण्यामधील दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) बिकिनीच्या रंगामुळे वाद निर्माण झाला होता. अनेकांनी दीपिकाच्या बिकिनीच्या रंगावर टीका केली होती. आता या वादावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी न्यूजच्या Press Conference या शोमध्ये संजय राऊत यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी संजय राऊत यांना पठाणमधील गाण्याच्या वादाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला संजय राऊत यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
काय म्हणाले संजय राऊत?
पठाण चित्रपटाच्या वादावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, 'पठाण चित्रपटावरुन एवढा वाद निर्माण करायची गरज नव्हती. भाजपच्या एका नेत्यांनी देखील उर्फी जावेदच्या कपड्यांवर आक्षेप घेतला. यापेक्षा पण मोठे प्रश्न या देशात आहेत. तुम्ही त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून या विषयांवर चर्चा करता. जर भगव्या रंगाच्या कपड्यांबाबत बोलायचं असेल, तर जे भाजपसोबत जोडले गेलेले कलाकार आहेत त्यांनी देखील अशा प्रकारचे कपडे परिधान केले होते. सेन्सॉर बोर्ड ही सरकारच्या हातातली बाहुली आहे. तो शाहरुख खानचा चित्रपट आहे, म्हणून त्यातील सिन कापला. जर मोठ्या पडद्यावर नंगानाच होत असेल आणि त्यावर जर कोणी विरोध करत असेल, तर ठिक आहे. पण फक्त त्या ड्रेसचा रंग भगवा आहे म्हणून जर तुम्ही चित्रपटामधील सिन काढत असाल, ते चुक आहे.'
#ABPPressConference: 'पठान' फिल्म पर हल्ला करने की जरूरत नहीं है : संजय
— ABP News (@ABPNews) January 14, 2023
देखिए @dibang के साथ प्रेस कॉन्फ्रेंस | https://t.co/smwhXUROiK #SanjayRaut #Mumbai #ABPNews #ShivSena pic.twitter.com/j61KaQSJCR
शाहरुखचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. भारताबरोबरच स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: