एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'पद्मावती' चित्रपटाचं रीलिज लांबणीवर, निर्मात्यांची घोषणा
पद्मावती कधी प्रदर्शित होणार, याबाबत अद्याप मौन बाळगण्यात आलं आहे.
मुंबई : 'पद्मावती' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडली आहे. 1 डिसेंबर रोजी रीलिज होणारा हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन रीलिजिंग डेट लवकरच जाहीर केली जाणार आहे.
सीबीएफसीकडून अद्याप पद्मावती चित्रपटाला सर्टिफिकेट मिळालेलं नाही. त्यातच या सिनेमाचं मीडिया स्क्रीनिंग केल्यामुळे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी नाराज होते.
रणवीर सिंग, दीपिका पदुकोन आणि शाहीद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'पद्मावती' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राजपूतांच्या राणीचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करत करणी सेनेने सिनेमाला विरोध केला आहे. पद्मावती कधी प्रदर्शित होणार, याबाबत अद्याप मौन बाळगण्यात आलं आहे.
निर्माते व्हायाकॉम 18 यांनी मात्र आपण स्वेच्छेने सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर टाकत असल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकात केला आहे. सीबीएफसीबद्दल आपल्याला आदर असल्याचं सांगत लवकरच सिनेमाला हिरवा कंदील मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
'राजपूतांची परंपरा आणि सन्मान यांचं चित्रण पद्मावतीमध्ये केलं आहे. ही कहाणी पाहून प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरुन येईल, आम्ही कायद्याचं पालन करणारे जबाबदार नागरिक आहोत. लवकरच सिनेमाला हिरवा कंदील मिळेल. रीलिजिंग डेट लवकरच जाहीर करु' असं व्हायाकॉमने म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
राजकारण
Advertisement