![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sanjay Dutt : संजू बाबा पोहचला बागेश्वर बाबांच्या धाममध्ये; म्हणाला, 'जगभरातील लोकांसाठी हे मोठं श्रद्धेचं केंद्र'
Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्त हा बागेश्वर बाबांच्या आश्रमात पोहचला असून त्यानंतर त्याने प्रतिक्रिया देखील दिली आहे.
![Sanjay Dutt : संजू बाबा पोहचला बागेश्वर बाबांच्या धाममध्ये; म्हणाला, 'जगभरातील लोकांसाठी हे मोठं श्रद्धेचं केंद्र' Sanjay Dutt visits Bageshwar Dham in Madhya Pradesh also took blessings from Dhiren Krishna Shastri Entertainment Bollywood detail marathi news Sanjay Dutt : संजू बाबा पोहचला बागेश्वर बाबांच्या धाममध्ये; म्हणाला, 'जगभरातील लोकांसाठी हे मोठं श्रद्धेचं केंद्र'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/47d6e17b7d1894cae8056fc6d76b34341718534993835720_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Dutt : बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) नुकतीच मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बागेश्वर धामला भेट दिली. संजय दत्तने त्याच्या संपूर्ण टीमसह बागेश्वर धामच्या (Bageshwar Dham) बालाजी महाराजांचंही दर्शन घेतलं आहे. त्याने बागेश्वर बाबांचीही यानिमित्ताने भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वादही घेतले. सध्या संजय दत्तचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हारयल होत असल्याचं पाहायला मिळतंय.
वृत्तानुसार, संजय दत्त हा शनिवार 15 जून रोजी दुपारी चार वाजता मुंबईतील बागेश्वर धामसाठी रवाना झाला. त्यानंतर तो संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास खुजराहो विमानतळावर पोहचला. धाम परिवाराने संजय दत्तचं जोरदार स्वागतही केलं. नंतर तो बागेश्वर धामला रवाना झाला. तिथे पोहचल्यावर त्याने पहिल्यांदा बालाजी महाराजांचे दर्शन घेतले, तिथे प्रदक्षिणा घातली आणि आशीर्वाद घेतले. यावेळी संजय दत्तसोबत धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांचीही भेट घेतली.
संजय दत्तने काय म्हटलं?
संजय दत्तने आज तकसोबत संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटलं की, देशातीलच नाही तर जगभरातील लोकांसाठी हे एक मोठं श्रद्धेचं केंद्र आहे. मी इथल्या भाविकांची श्रद्धा पाहून भारावून गेलोय. महाराजांना भेटून तर असं वाटलं की, मी त्यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखत आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगल्या क्षणांपैकी हा एक क्षण आहे. मी पुन्हा इथे येईन. हे एक अद्भुत ठिकण आहे.
View this post on Instagram
संजय दत्तचे सर्वोत्कृष्ट सिनेमे कोणते? (Sanjay Dutt best Movies)
सुनील दत्त दिग्दर्शित 'रॉकी' या सिनेमाच्या माध्यमातून संजयने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. संजयची मुख्य भूमिका असलेला 'नाम' हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील 'चिठ्ठी आई है' हे गाणं खूपच लोकप्रिय झालं. महेश भट्ट दिग्दर्शित सडक या सिनेमात संजय मुख्य भूमिकेत होता. त्याचे 'साजन', 'कुरुक्षेत्र' आणि 'मुन्ना भाई एमबीबीएस' हे सिनेमेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)