Sanjay Dutt: 'खलनायकच्या सिक्वेलमध्ये रणवीरने काम करु नये'; असं का म्हणाला संजय दत्त?
‘केस तो बनता है’ (Case Toh Banta Hai) या कार्यक्रमाच्या एका एपिसोडमध्ये अभिनेता संजय दत्तनं (Sanjay Dutt) देखील हजेरी लावली. या एपिसोडमध्ये संजयला काही प्रश्न विचारण्यात आले.
![Sanjay Dutt: 'खलनायकच्या सिक्वेलमध्ये रणवीरने काम करु नये'; असं का म्हणाला संजय दत्त? sanjay dutt does not want ranveer singh play his khalnayak role Sanjay Dutt: 'खलनायकच्या सिक्वेलमध्ये रणवीरने काम करु नये'; असं का म्हणाला संजय दत्त?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/609d1c1a38da6fa306f018a4245231c31666405842843259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Case Toh Banta Hai: ‘केस तो बनता है’ (Case Toh Banta Hai) हा कोर्ट रुम कॉमेडी शो प्रेक्षकांचे सध्या मनोरंजन करत आहे. हा कार्यक्रम मिनी अॅमेझन टीव्हीवर प्रेक्षक पाहू शकतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा वकिलाची भूमिका साकारतो. करीना कपूर, अनिल कपूर, वरुण धवन यांसारख्या कलाकारांनी या कार्यक्रमात उपस्थिती लावली. या कार्यक्रमाच्या एका एपिसोडमध्ये अभिनेता संजय दत्तनं (Sanjay Dutt) देखील हजेरी लावली. या एपिसोडमध्ये संजयला काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची संजयनं मजेशीर उत्तरं दिली.
काय म्हणाला संजय दत्त?
संजय दत्तला केस तो बनता है या कार्यक्रमामध्ये खलनायक या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत विचारण्यात आलं. 'जर खलनायकचा सिक्वेल झाला तर अभिनेता रणवीर सिंह, विक्की कौशल आणि रणबीर कपूर यांमध्ये कोणत्या अभिनेत्यानं या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारावी?' असा प्रश्न संजयला विचारण्यात आला. यावेळी संजयनं उत्तर दिलं, 'खलनायकच्या सिक्वेलमध्ये रणवीरने काम करु नये' पुढे संजय म्हणाला, 'कारण सध्या तो कपडे परिधान करत नाही.'
रितेश देशमुखने संजय दत्तला केस तो बना है या कार्यक्रमात त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारले. संजय दत्तने त्याच्या 308 गर्लफ्रेंड होत्या, असं सांगितलं. रितेशने अनेक प्रश्न संजय दत्तला विचारले. कार्यक्रमात सर्किटची भूमिका साकारणारी विनोदी कलाकार सुगंधा भोसलेबाबत देखील संजय दत्तने सांगितलं. एवढा सुंदर सर्किट पहिल्यांदाच पाहिला, असं संजय म्हणाला.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Shahrukh Khan : ...जेव्हा शाहरुख खान संजू बाबाची नक्कल करतो; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)