Sania Mirza Shoaib Malik : सानिया मिर्झा अन् शोएब मलिकचं बिनसलं? टेनिस स्टारने इंस्टाग्रामवरील पतीसोबतचे फोटो केले डिलीट
Sania Mirza Deletes Shoaib Malik Photos : सानिया मिर्झाने शोएब मलिकसोबतचे फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केले आहेत. त्यामुळे सानिया आणि शोएबचं बिनसलं असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
Sania Mirza Deletes Shoaib Malik Photos : टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib) यांचं बिनसलं असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सानियाने शोएबसोबतचे फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केले आहेत. सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिकची जोडी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण आता त्यांच्यात अलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. सानियाने सोशल मीडियावरुन शोएबसोबतचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. त्यामुळे आता सानिया आणि शोएबचं बिनसलं असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अद्याप सानिया किंवा शोएबने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.
सानिया मिर्झा अन् शोएब मलिकमध्ये दुरावा? (Sania Mirza Shoaib Malik Divorce)
सानिया मिर्झा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर तिने अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. पण आता तिने सोशल मीडियावरुन शोएबसोबतचे फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे सानिया आणि शोएबमध्ये दुरावा आल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे शोएबनेदेखील इंस्टाग्राम बायोमधील सानियासोबत लग्न झाल्याची माहिती काढून टाकली आहे. याआधी त्याने 'सुपरवुमनचा पती' असं बायोमध्ये लिहिलं होतं.
View this post on Instagram
'या' कारणाने सानिया आणि शोएबचं बिनसलं?
शोएब मलिक पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरसोबत रिलेशनमध्ये आहे. याच कारणाने सानिया आणि शोएबच्या नात्यात दुरावा आला आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक 2010 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नाआधी पाच महिने त्यांनी एकमेकांना डेट केलं आहे. शोएब आणि सानियाच्या मुलाचं नाव इजहान आहे. शोएब मलिकने आतापर्यंत 25 कसोटी, 281 एकदिवसीय आणि 123 टी-20 सामन्यात पाकिस्तानाच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. सानियाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने लिहिलं होतं,"एखादी गोष्ट जर संपुष्टात येणार असेल तर त्याचा विचार करू नये". सानियाच्या या पोस्टनंतर तिचं आयुष्य आलबेल नसल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
संबंधित बातम्या