![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी' अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार; 500 व्या प्रयोगाने नाटकाचा प्रवास आता विसावणार
Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी' हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
![Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी' अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार; 500 व्या प्रयोगाने नाटकाचा प्रवास आता विसावणार Sangeet Devbabhali Marathi Natak Latest Update Sangeet Devbabhali milestone drama on marathi theater sangeet devbabhali will bid farewell to the audience Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी' अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार; 500 व्या प्रयोगाने नाटकाचा प्रवास आता विसावणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/20/975556bb0f2671a84f225390e52337471700473483696254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी' (Sangeet Devbabhali) हे मराठी रंगभूमीवरील गाजत असलेलं नाटक आहे. पण आता हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 500 व्या प्रयोगाने या नाटकाचा प्रवास विसावणार आहे. कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर 'संगीत देवबाभळी' प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. श्री षण्मुखानंद सभागृहात या नाटकाचा शेवटचा प्रयोग पार पडेल.
'संगीत देवबाभळी' ची नाट्य दिंडी विसावणार
22 डिसेंबर 2017 यादिवशी 'भद्रकाली' प्रॉडक्शन' च्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाचा शुभारंभ झाला. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही 'संगीत देवबाभळी' ची नाट्य दिंडी विसावणार आहे. बुधवार, 22 नोव्हेंबर, संध्याकाळी 6.30 वाजता श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, सायन, मुंबई येथे शेवटचा प्रयोग संपन्न होणार आहे.
कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर 'संगीत देवबाभळी' निरोप घेणार
'संगीत देवबाभळी'चा हा सहा वर्षांचा प्रवास इतका सहज आणि सोपा नव्हता. एक नवा विषय, नवीन लेखक, नवे कलाकार घेऊन व्यावसायिक रंगभूमीवर येणे तसे अवघड होते. परंतु भद्रकालीने हा प्रयोग केला आणि आपल्या साथीने तो यशस्वही झाला. मध्ये कोरोना सारखं भयाण संकट येऊन गेलं पण त्यानंतरही आपलं प्रेम कमी झालं नाही, ते चंद्रभागेसारखं वाहतच राहिलं. याच प्रेमामुळे या नाटकाने सर्वाधिक 44 पुरस्कार प्राप्त केले आणि लाखो रसिकांसह अनेक दिग्गजांच्या मनाला भुरळ घातली. मजल दरमजल करत अवघा महाराष्ट्र विठुमय करणारी ही 'देवबाभळी' आता 500 व्या प्रयोगापर्यंत येऊन पोहोचली आहे.
View this post on Instagram
खरं तर मायबाप रसिकांचा आग्रह आहे की, नाटक बंद करू नका मात्र कुठेतरी थांबणं हे गरजेचं असतं, म्हणून ही वारी 500 व्या प्रयोगापर्यंत नेवून आपण थांबणार आहोत. महाराष्ट्रातला हा शेवटचा प्रयोग 22 नोव्हेंबर 2023 रोजी सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह येथे मोठ्या दिमाखात सादर होत आहे. अनेकांनी हा प्रयोग अजूनही पाहिलेला नाही तर काहींनी या प्रयोगाची पारायणं केली आहेत. अशा सर्व मायबाप रसिकांसाठी 'संगीत देवबाभळी' हे नाटक पाहण्याची ही शेवटची संधी आहे.
संबंधित बातम्या
Sangeet Devbabhali : मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटक 'संगीत देवबाभळी' घेणार प्रेक्षकांचा निरोप; 'या' दिवशी रंगणार शेवटचा प्रयोग
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)