(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sandeep Pathak: "....असा झाला होता 'वऱ्हाड निघालंय लंडनला' चा पहिला प्रयोग" जेव्हा संदीप पाठकनं सांगितलं होता किस्सा; जाणून घ्या अभिनेत्याच्या नाटक, चित्रपट आणि मालिकांबद्दल....
एका मुलाखतीमध्ये संदीपनं (Sandeep Pathak) वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचा किस्सा सांगितला होता.
Sandeep Pathak: अभिनेता संदीप पाठक (Sandeep Pathak) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. तो नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतो.संदीपला वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. एका मुलाखतीमध्ये संदीपनं वऱ्हाड निघालंय लंडनला (Varhad Nighalay Londonla) या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचा किस्सा सांगितला होता.
संदीपनं सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाबद्दल सांगितलं. तो म्हणाला,"मी त्या नाटकाचा पहिला प्रयोग औरंगाबादला केला. माझी बायको त्या प्रयोगाला नव्हती आली, कारण तिला खूप टेंशन आलं होतं. माझी आई आणि भाऊ त्या प्रयोगाला आले होते. भावानी माझ्यासाठी औषध आणली होती. कारण मला खूपच टेंशन आलं होतं."
पुढे संदीप म्हणाला, "प्रयोग सुरु असताना माझी आई माझ्या भावाला म्हणाली होती की, हा माझा मुलगा वाटतच नाहीये, असं वाटतंय त्याचा अंगात कोणीतरी संचारलं आहे. प्रयोग झाल्यानंतर मी खूप रडलो होतो."
वऱ्हाड निघालं लंडनला हे नाटक लक्ष्मणराव देशपांडे (Laxmanrao Deshpande) यांनी रंगभूमीवर आणलं. लक्ष्मणराव देशपांडे यांनी या नाटकात केलेला अभिनय, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, त्यांची विनोदी शैली याचे प्रेक्षक आजही कौतुक करतात. त्यांनी या नाटकाचे जगभरात 1960 प्रयोग केले. आता या नाटकामध्ये संदीप काम करतो.
View this post on Instagram
श्वास,एक डाव धोबीपछाड,हरिश्चंद्राची फॅक्टरी,गैर, रंगा पतंगा, पोश्टर गर्ल आणि शिक्षणाच्या आयचा घो! या चित्रपटांमध्ये संदीपनं काम केलं. सखाराम बाइंडर, असा मी तसा मी, व्यक्ती आणि वल्ली या नाटकांमधील संदीपच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. असंभव, एका लग्नाची दुसरी गोष्ट यांसारख्या मालिकांमध्ये देखील संदीपनं काम केलं आहे. हसा चकट फू, फू बाई फू या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येऊन संदीपनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
View this post on Instagram
संबंधित बातम्या