Sam Bahadur Box Office Collection: वीकेंडला विकी कौशलच्या सॅम बहादुर चित्रपटाचा जलवा; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Sam Bahadur Box Office Collection: अॅनिमल या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला पण सॅम बहादुर चित्रपटाची देखील बॉक्स ऑफिसवर जादू दिसली. जाणून घेऊयात सॅम बहादुर या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Sam Bahadur Box Office Collection: अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 70 कोटींहून अधिक कलेक्शन केलं आहे. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. अॅनिमल या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला पण सॅम बहादुर चित्रपटाची देखील बॉक्स ऑफिसवर जादू दिसली. जाणून घेऊयात सॅम बहादुर या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, विकी कौशलचा सॅम बहादुर हा चित्रपट मागील एका आठवड्यापासून बॉक्स ऑफिसवर 2 ते 2.5 कोटींचे कलेक्शन करत आहे . पण रिलीजच्या तिसऱ्या शनिवारी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली. या चित्रपटाने 4.5 कोटींची कमाई केली. आता चित्रपटाच्या 17 व्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे सुरुवातीचे आकडे समोर आले असून त्यानुसार या चित्रपटाने आतापर्यंत 2.56 कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाचं कलेक्शन जवळपास 73.91 रुपये झाले आहे.
सॅम बहादुर चित्रपटाचं आतापर्यंतचं कलेक्शन-
Day 1 | 6.25 कोटी |
Day 2 | 9 कोटी |
Day 3 | 10.3 कोटी |
Day 4 | 3.5 कोटी |
Day 5 | 3.5 कोटी |
Day 6 | 3.25 कोटी |
Day 7 | 3 कोटी |
Day 8 | 3.5 कोटी |
Day 9 | 6.75 कोटी |
Day 10 | 7.5 कोटी |
Day 11 | 2.15 कोटी |
Day 12 | 2.45 कोटी |
Day 13 | 2 कोटी |
Day 14 |
1.65 कोटी |
Day 15 | 2.25 कोटी |
Day 16 | 4.5 कोटी |
Day 17 | 2.56 कोटी |
एकूण कलेक्शन | 73.91 कोटी |
'सॅम बहादुर' चित्रपटाची स्टार कास्ट
'सॅम बहादुर' हा चित्रपट भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक आहे. या चित्रपटात विकीनं सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री सान्या मल्होत्राने या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. फातिमा सना शेखने या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
विकीचा आगामी चित्रपट
विकी कौशल हा सॅम बहादुर या चित्रपटानंतर शाहरुख खानच्या'डंकी' या चित्रपटात दिसणार आहे. राजकुमार दिग्दर्शित हा चित्रपट 21 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: