VIDEO : बरगड्यांना दुखापत, वेदनेनं व्याकूळ सलमान पोहोचला 'बिग बॉस 18'च्या सेटवर
Salman Khan Bigg Boss 18 Shooting : बिग बॉस सीझन 18 लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यंदाचा सीझन सुरु होण्यापूर्वीच गेल्या काही काळापासून त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
![VIDEO : बरगड्यांना दुखापत, वेदनेनं व्याकूळ सलमान पोहोचला 'बिग बॉस 18'च्या सेटवर Salman khan Start shoot of Bigg Boss 18 Bhaijaan s injury attracts fans attention BTS of promo shoot goes viral marathi news VIDEO : बरगड्यांना दुखापत, वेदनेनं व्याकूळ सलमान पोहोचला 'बिग बॉस 18'च्या सेटवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/06/9ceee363d1cb86a08471d8930b8a4de01725600149667322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss 18 : बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. बिग बॉस सीझन 18 लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यंदाचा सीझन सुरु होण्यापूर्वीच गेल्या काही काळापासून त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. बिग बॉस शो यंदा सलमान खान होस्ट करणार नाही, अशा अफवाही होत्या. मात्र, बिग बॉसच्या चाहत्यांसाठी गोड बातमी समोर आली असून सलमान खानच हा शो होस्ट करणार आहे.
वेदनेनं व्याकूळ सलमान पोहोचला 'बिग बॉस 18'च्या सेटवर
अभिनेता सलमान खान बिग बॉस 18 होस्ट करण्यास सज्ज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खाननं बिग बॉस 18 शोचं शूटिंगही सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. बिग बॉस 18 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये (Bigg Boss OTT 3) देखील चाहत्यांना सलमान खानची कमी जाणवली. आता सलमान खान पुन्हा एकदा होस्टच्या भूमिकेत दिसणार आहे.
बिग बॉस 18 चं प्रोमो शूट
सलमान खान तब्येतीच्या कारणामुळे बिग बॉस शो होस्ट करणार नसल्याचं बोललं जात होतं. बरगडीच्या दुखापतीमुळे सलमान खान बिग बॉस 18 चा भाग नसल्याच्या बातमी समोर आल्या होत्या, पण आता सलमान खान थेट बिग बॉसच्या सेटवर पोहोचल्यामुळे त्याने सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. सलमान खान बिग बॉस 18 च्या प्रोमो शूट करण्यासाठी बिग बॉसच्या सेटवर पोहोचल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सलमान खान बिग बॉस 18 च्या सेटच्या बाहेर दिसत आहे. आगामी रिॲलिटी शो बिग बॉस 18च्या प्रोमोच्या शूटिंगसाठी सलमान खान सेटवर पोहोचला होता. ब्लॅक ब्लेझर आणि पँटसोबत निळ्या शर्टमध्ये सलमान खान खूपच हँडसम दिसत आहे.
बिग बॉस सीझन 18 च्या शूटचा श्री गणेशा
सलमान खानने मुंबईतील 'बिग बॉस' सीझन 18 च्या प्रोमो शूटला हजेरी लावली. यावेळी त्याने सांगितलं की, त्याच्या दोन बरगड्या तुटलेल्या आहेत. अशा स्थितीतही तो बिग बॉस 18 शो होस्ट करणार आहे. प्रकृती अस्वस्थता असूनही, त्याने चाहते आणि पापाराझींशी संवाद साधला. ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणाऱ्या 'सिकंदर' या आगामी चित्रपटात काम करताना सलमान खानला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
#SalmanKhan effortlessly raises d bar with his iconic style in the #BiggBoss18 promo! His charisma is unmatched n d excitement is real 🙌@BeingSalmanKhan Take care Bhai, always rooting for u ❤️🔥 pic.twitter.com/hgT8JyveOL
— Being Hitesh Shah (@BeingHiteshShah) September 5, 2024
सलमानच्या दुखापतीनं वेधलं लक्ष
यावेळी व्हिडीओमध्ये सलमान खान फोटोसाठी पोज देताना त्याला दुखापतीमुळे त्रास होत असल्याचं दिसलं. तो हालचाल करताना त्याच्या बरगड्यांना हात लावताना दिसला, ज्यावरुन त्याला वेदना होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. वेदना होत असतानाही सलमान बिग बॉसच्या सेटवर पोहोचला आणि सेट बाहेर त्याने चाहत्यांचीही भेट घेतली. त्याच्यासोबत प्रोमोही शूट केला. 'बिग बॉस 18' चा प्रोमो सप्टेंबर 2024 च्या मध्यात चाहत्यांच्या भेटीला येण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)