एक्स्प्लोर
'सुलतान'च्या शूटिंगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटायचं : सलमान
मुंबई : अनेक वादांमुळे कायम चर्चेत असलेला बॉलिवूडचा सुपरस्टार पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 'सुलतान' चित्रपटाच्या शुटिंगनंतर आपल्याला बलात्कार पीडितेसारखं वाटत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सलमान खानने केलं आहे.
'दररोज 120 किलो वजनाच्या माणसाला 10 वेगवेगळ्या अँगलमधून 10 वेळा उचलावं लागत होतं. दररोज सहा तास ही कसरत केल्यानंतर मला धड चालताही येत नव्हतं. कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडताना मला बलात्कार झाल्यासारखं वाटायचं' असं विधान सलमानने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत केलं.
सलमानने स्वतःची तुलना बलात्कार पीडितेशी केल्याने त्याचे चाहतेही नाराज झाले आहेत. सोशल मीडियातून सलमानवर टीकेची झोड उठली आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी केलेल्या मेहनतीची तुलना रेप पीडितेशी जोडणं हे लज्जास्पद असल्याचं म्हटलं जात आहे. बलात्कार पीडितेला कोणत्या यातनांना सामोरं जावं लागतं, याची कल्पना सलमान कधीच येऊ शकत नाही, असंही म्हटलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement