Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : सलमानच्या नव्या चित्रपटाचं नाव जाहीर; लूकनं वेधलं लक्ष
सलमान आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) यांचा लवकरच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या नावाची घोषणा आज (सोमवार) करण्यात आली आहे.
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. सलमान आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) यांचा लवकरच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या नावाची घोषणा आज (सोमवार) करण्यात आली आहे.
सलमानच्या नव्या चित्रपटाचं नाव
सलमानच्या आगामी चित्रपटाचं नाव 'किसी का भाई किसी की जान' असं आहे. या चित्रपटातील सलमानचा लूक देखील रिव्हिल करण्यात आला आहे. लांब केस, डोळ्यावर गॉगल अशा डॅशिंग लूकमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमान खान फिल्म्स या नावाच्या युट्युब चॅनलवरुन 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील सलमानच्या लूकचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सलमानच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता खूप वाढली आहे.
पाहा व्हिडीओ:
'हे' कलाकार साकारणा प्रमुख भूमिका:
फरहाद सामजी दिग्दर्शित 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्यासोबतच अभिनेत्री शहनाज गिल देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ती या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर पलक तिवारी, व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, राघव जुयाल हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
किसी का भाई किसी की जान हा एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानसह साजिद नाडियाडवालाने केली आहे. या चित्रपटात पूजा आणि सलमानची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच 'टायगर-3' या सलमानच्या आगामी चित्रपटांची वाट चाहते उत्सुकतेने पाहात आहेत. टायगर-3 हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच सलमान बिग बॉसच्या नव्या सिझनचं सूत्रसंचालन देखील करणार आहे. सलमान हा रितेश देशमुखच्या वेड या चित्रपटामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी रितेशनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली. सलमानच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Salman Khan : मोकळे केस, काळा गॉगल अन् बाईक, लेह-लडाखमध्ये दिसला सलमान खानचा स्वॅगर लूक!