Salman Khan : ईदच्या मुहूर्तावर सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' प्रदर्शित होणार नाही; रिलीज डेट ढकलली पुढे
KKBKKJ Release Date : सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Release Date : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचा टीझर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
'किसी का भाई किसी की जान' कधी होणार रिलीज?
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाचा ट्रेलर अद्याप प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही. चाहते ट्रेलरची प्रतीक्षा करत आहेत. 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 21 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता हा सिनेमा 24 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीने सांभाळली आहे. या सिनेमात सुपरस्टार रणवीर सिंहदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टर शेअर करत सलमानने 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली होती. पण आता हा सिनेमा 24 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाच्या नव्या रिलीज डेटबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. सलमान खानसह या सिनेमात शहनाज गिल, पूजा हेगडे आणि वेंकटेश दग्गुबाती, पलक तिवारी आणि राघव जुयालदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
सलमान खान ईदच्या मुहूर्वावर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणत असतो. पण आता 'किसी का भाई किसी की जान' हा त्याचा बहुचर्चित सिनेमा ईदच्या दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित होणार नसल्याने चाहते नाराज झाले आहेत. पण ईदनंतर लगेचच 24 एप्रिलला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या