एक्स्प्लोर

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलिसांची उडी; चौकशी मागचे कारण अद्याप अस्पष्ट

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी उडी घेतली आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपी विकी गुप्ता आणि सागर पाल यांची काही तास चौकशी केली. चौकशी मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या चर्चेत आहे. सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) उडी घेतली आहे. दिल्ली क्राइम ब्रँचच्या एका पथकाने मुंबईत येऊन बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरी गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींची चौकशी केली. दिल्ली पोलिसांनी आरोपी विकी गुप्ता आणि सागर पाल यांची काही तास चौकशी केली. चौकशी मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

14 एप्रिल रोजी झाला होता गोळीबार

14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर  गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आरोपींचे चेहरे दिसले. या घटनेच्या 72 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 

गोळीबाराचा संबंध बिश्नोई गँगशी

गोळीबाराचा लॉरेन बिश्नोई गँगशी (Bishnoi Gang) संबंध आहे. याआधी देखील बिश्नोई गँगकडून सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात काळविटांना देवासमान मानले जाते.  1998 मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच लॉरेन्सकडून सलमान खान धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता, घराजवळ गोळीबार झाला. 

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे आरोपी नवी मुंबईतील पनवेलमध्ये वास्तव्य करत होते. मागील एक महिन्यापासून त्यांनी पनवेलमध्ये भाड्यावर घर घेतले होते. या दोघांनी सलमान खानच्या घराची रेकी केली आणि त्यानंतर गोळीबार केला. दोन्ही आरोपींना सोमवारी रात्री उशिरा भूजमधून मुंबई पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी हे मूळचे बिहार राज्यातील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील आहे. या दोन्ही आरोपींना मुंबईत आणले जाणार आहे. 

मुंबई पोलिसांना मोठं यश

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे अन्वेषण शाखेला (Crime Branch) मोठं यश मिळाले आहे. गुजरातमधील सूरत येथे तापी नदीत (Tapi River) फेकलेली दुसरे पिस्तुलही पोलिसांनी हस्तगत केले आहे.

संबंधित बातम्या

Salman Khan House Firing : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांना मिळाले मोठं यश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला

व्हिडीओ

John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report
Shivsena BJP Seat Sharing : पालिका निवडणुकीसाठी 50-50 फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही Special Report
Devendra Fadnavis Vidhan Sabha : विरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांची जोरदार टोलबाजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
Embed widget