(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सलमान खानचा 'राधे' थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी नवी योजना, 13 मे रोजी अनेक प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार
Radhe: Your Most Wanted Bhai Release Date: 'राधे' जीप्लॅक्सवरील 'पे पर व्ह्यू' मॉडेल व्यतिरिक्त सर्व डीटीएच चॅनेलवरील प्रेक्षकांना उपलब्ध असेल जिथे प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी निश्चित रक्कम मोजावी लागेल.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे बॉलिवूड खूपच त्रस्त आहे. अशा परिस्थितीत सर्व छोट्या-मोठ्या चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलावी लागल्यामुळे सर्व निर्माते खूप नाराज आहेत. अशा परिस्थितीत ईदमध्ये रिलीज होणाऱ्या सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाविषयी एक नवीन बातमी समोर आली आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे ईदवर रिलीज करता न आल्याने ‘राधे’ चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यासाठी सलमान खानने नवा मार्ग निवडला आहे. 'राधे' चित्रपटगृह तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि सर्व डीटीएच प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी प्रदर्शित होईल. ‘राधे’ चित्रपटाचे ओटीटी हक्क जी 5 कडे आहेत आणि ‘राधे’ थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाँच करण्याच्या चर्चेच्या दरम्यान सलमान खानने स्पष्ट केले की हा चित्रपट प्रथम थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
सलमान खान-दिशा पटानी स्टारर आणि प्रभुदेवा दिग्दर्शित 'राधे' थिएटरसह ओटीटीच्या व्यासपीठावर येणार आहे, पण वेगळ्या मार्गाने. हा चित्रपट 'पे पर व्ह्यू' मॉडेलवर जीप्लेक्स आणि सर्व डीटीएच चॅनेलवर एकाच वेळी प्रसारित केला जाईल जिथे प्रत्येक दर्शकाला चित्रपट पाहण्यासाठी काही रक्कम मोजावी लागते आणि त्यानंतरच चित्रपट प्रसारित केला जाऊ शकतो. याखेरीज जिथे देश-विदेशात सिनेमागृह सुरू झाली आहेत, तिथे 13 मे रोजी चित्रपटगृहात ‘राधे’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
The perfect Eid celebration!💥 #Radhe: Your Most Wanted Bhai, releasing simultaneously on multiple platforms worldwide.#RadheThisEid
— Salman Khan Films (@SKFilmsOfficial) April 21, 2021
@BeingSalmanKhan @bindasbhidu @DishPatani @RandeepHooda @PDdancing @ZeeStudios_ @SohailKhan @atulreellife @reellifeprodn @ZeeMusicCompany pic.twitter.com/TzD3s3eLDi
कोरोनाची नवी लाट आणि वातावरण सामान्य होणार नसल्याची परिस्थिती असताना 'राधे' चित्रपटगृहांसह ओटीटी व सर्व डीटीएच प्लॅटफॉर्मवर एकत्र प्रसारित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘राधे’ हा बॉलीवूडचा पहिला चित्रपट ठरला जाईल, जो एकाच दिवशी, थिएटरसह ओटीटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. स्वत: सलमान खाननेही सोशल मीडियाच्या माध्यमातून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गेल्या महिन्यात कबीर बेदी यांच्या बायोपिकच्या लाँचिंगवेळी सलमान खान म्हणाला होती की कोरोनाची परिस्थिती सुधारल्यास यावर्षी ईदच्या निमित्ताने 'राधे' प्रदर्शित होईल. सलमान पुढे असाही म्हणाला की सध्याच्या परिस्थितीत काही बदल झाला नाही तर पुढच्या वर्षी ईदच्या निमित्ताने 'राधे' चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.
मध्यपूर्व, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, युरोप, उत्तर अमेरिका, सिंगापूर यासह जगातील 40 देशांमध्ये राधे प्रदर्शित होईल. यासह, गेल्या वर्षी कोरोना साथीच्या नंतर 'राधे' हा पहिला हिंदी चित्रपट युरोपच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.