Salman Khan : सलमानने घराबाहेर येऊन ईदच्या शुभेच्छा दिल्याच नाहीत; भाईजानचे चाहते नाराज
Salman Khan : सलमानने घराच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत.
Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. ईदच्या दिवशी भाईजानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. पण भाईजानने आता चाहत्यांना नाराज केलं आहे. सलमान खानने घराबाहेर येऊन चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिलेल्या नाहीत.
गेल्यावेळी सलमानने 'गॅलेक्सी अपार्टमेंट'च्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दरवर्षी सलमान बाल्कनीत येऊन चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देत असतो. त्यामुळ आजही चाहत्यांनी सलमानच्या घराबाहेर गर्दी केली होती. पण सलमान घराच्या बाहेर न आल्याने चाहते नाराज झाले आहेत.
View this post on Instagram
सलमान खान सध्या 'कभी ईद कभी दिवाली' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे सुरक्षिततेच्या कारणामुळे चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा द्यायला सलमान बाल्कनीत आला नाही, असे म्हटले जात आहे. 'गॅलेक्सी अपार्टमेंट'च्या आसपास 15 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.
शाहरुखने चाहत्यांना दिल्या शुभेच्छा
शाहरुख चाहत्यांना भेटण्यासाठी मन्नतच्या बाल्कनीत आला तेव्हा त्याचा धाकटा मुलगा अबरामही त्याच्यासोबत होता. दरम्यान शाहरुख कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाला. त्याने पांढऱ्या टी-शर्टसोबत निळ्या रंगाची कार्गो पॅन्ट घातली होती. तर अबरामने लाल टी-शर्ट घातले होते. शाहरुख आणि अबरामचा चाहत्यांना शुभेच्छा देतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या