Salman Khan: कुणी म्हणतंय, 'पीटी टीचर' तर कुणी म्हणतंय, 'मुर्गी वाली डान्स स्टेप'; 'नय्यो लगदा' गाण्यामुळे सलमान खान ट्रोल
'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) मधील 'नय्यो लगदा' गाणं सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या गाण्यामधील सलमानच्या (Salman Khan) एका डान्स स्टेपला नेटकरी ट्रोल करत आहेत.
Salman Khan Trolled For Naiyo Lagda Song: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील पहिलं गाणं काल (12 फेब्रुवारी) प्रेक्षकांच्या भेटीस आलं. 'नय्यो लगदा' (Naiyo Lagda) असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यामधील सलमान आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. 'नय्यो लगदा' गाणं सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या गाण्यामधील सलमानच्या एका डान्स स्टेपला नेटकरी ट्रोल करत आहेत.
सलमानला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
सलमानच्या 'नय्यो लगदा' गाण्यामधील स्टेपला ट्रोल करत एका नेटकऱ्यानं ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, 'असं वाटत आहे कोरिओग्राफरच्या ऐवजी पीटी टीचरला बोलावलं होतं.'
Lagta hai choreographer ki jagah school PT teacher ko bulaya tha 🤣#NaiyoLagda pic.twitter.com/Jmm8KD7jIv
— རིསམའཔ. (@iThunderstormx) February 12, 2023
एका नेटकऱ्यानं सलमानचा 'नय्यो लगदा' गाण्यामधील फोटो शेअर केला. या फोटोमध्ये , 'भैय्या डान्सर दिखाना, थोडा सस्तावाला' असं लिहिलेलं दिसत आहे.
😂😂😂#NaiyoLagda#KisiKaBhaiKisiKiJaan pic.twitter.com/PqabgYqNC0
— Johny Rider (@riderJohnyBaba) February 13, 2023
एका युझरनं ट्विटरवर एक किस्सा शेअर केला. यामध्ये लिहिलं आहे, 'माझ्या चुलत भावाला मी सलमानचा डान्स दाखवला. त्याला पटलं की सलमान चांगला डान्सर आहे.'या ट्वीटला रिप्लाय देत एका नेटकऱ्यानं सलमानला ट्रोल केलं. त्यानं लिहिलं, 'सलमानची मुर्गी वालाची डान्स स्टेप पाहून त्याचा चुलत भाऊ वेडा होईल'
His cousin will go mad after watching Murgi Wala Dance Step of #SalmanKhan in #NaiyoLagda 😂😂 pic.twitter.com/MrBESFiLLB
— JUST A FAN. (@iamsrkfan_brk) February 12, 2023
पलक मुच्छल आणि कमाल खान यांनी नय्यो लगदा हे गाणं गायलं आहे. 21 एप्रिल 2023 रोजी 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. किसी का भाई किसी की जान हा एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट असणार आहे. हिमेश रेशमियानं (Himesh Reshammiya) या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
'किसी का भाई किसी की जान' मधील पहिलं गाणं रिलीज; 'नय्यो लगदा' मध्ये सलमान आणि पूजाचा रोमँटिक अंदाज