एक्स्प्लोर

Salman Khan Birthday : लाडक्या भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहता सायकलनं जबलपूरवरुन मुंबईला रवाना; पाच दिवसांत 1100 किलोमीटरचा प्रवास

Salman Khan : सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एका चाहत्याने 1100 किलोमीटरचा प्रवास केला आहे.

Salman Khan Birthday : आपल्या लाडक्या कलाकाराला पाहण्यासाठी किंवा भेटण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जायला तयार असतात. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे (Salman Khan) चाहते भारतातच नाही तर जगभरात आहेत. सध्या सोशल मीडियावर भाईजानचा एक चाहता चर्चेत आहे. समीर नामक या चाहत्याने सलमानला भेटण्यासाठी एक वेगळाच स्टंट केला आहे. समीर त्याच्या लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी सायकलने जबलपूरवरुन मुंबईला रवाना झाला आहे. 

सलमान खानचा 27 डिसेंबरला वाढदिवस आहे. त्यामुळे समीरला भाईजानला भेटून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. समीर गुरुवारी जबलपूरवरुन सायकलवर मुंबईला रवाना झाला आहे. प्रवास सुखकर करता यावा यासाठी त्याने सायकलला खास बॅटरी लावली आहे. 

समीरला अवघ्या पाच दिवसांत 1100 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. आता थंडीला सुरुवात झाल्याने त्याचा हा प्रवास खूपच आव्हानात्मक आहे. पण तो भाईजानचा जबरा फॅन असल्यामुळे त्याला भेटूनच सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्याने चार वर्षांपूर्वी पापण्यांवर सलमान खानचे नाव लिहिले आहे. तसेच त्याने त्याच्या हातावर सलमानच्या नावाचा खास टॅटूही बनवला आहे. 

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खटाटोप

समीर फक्त सलमानला भेटण्यासाठी सायकलवरून 1100 किलोमीटरचा प्रवास करतो आहे. समीर 27 डिसेंबरपर्यंत भाईजानच्या वाढदिवशी त्याच्यापर्यंत पोहोचू शकेल. 
 या जिद्दी चाहत्याला सलमान भेटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

सलमान खानच्या आगामी 'टायगर 3' हा सिनेमा पुढील वर्षात दिवाळीच्या मुहूर्वावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 12 नोव्हेंबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमानसह अभिनेत्री कतरिना कैफदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

सलमानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्यासोबतच अभिनेत्री शहनाज गिलदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर पलक तिवारी, व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, राघव जुयाल हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

संबंधित बातम्या

Salman Khan : लांबलचक केस, लेदर जॅकेट अन् काळा चष्मा; 'किसी का भाई किसी की जान'मधील भाईजानचा हटके लूक समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Embed widget