Salman Khan Birthday : दबंग भाईजानचा बर्थडे; मात्र शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर एकही फॅन नाही, कारण...
Salman Khan : सलमानच्या घराबाहेर यावर्षी गर्दी पाहायला मिळालेली नाही.
Salman Khan : बॉलिवूडचा दबंग अशी ओळख असलेल्या सलमान खानचा (Salman Khan) आज 57 वा वाढदिवस आहे. दरवर्षी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घराबाहेर चाहते गर्दी करत असतात. पण काल रात्री मात्र त्याच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळालेली नाही.
सलमानच्या मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी घराबाहेर चाहते दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. पण यंदा मात्र चाहत्यांनी अशी गर्दी केलेली पाहायला मिळाली नाही. मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणावरून गर्दी करू नका असं आवाहन केलं होतं. त्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सलमानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. सलमान आणि कुटुंबीय वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या बहिणीच्या घरी गेले आहेत. त्यामुळे मुंबईत सलमानच्या घराबाहेर पोलिसांनी चाहत्यांना थांबू दिलेलं नाही. त्यामुळेच सलमानच्या घराबाहेर दरवर्षीप्रमाणे चाहत्यांची गर्दी पाहायला मिळालेली नाही.
सलमान खान यंदा त्याच्या बहिणीच्या घरी 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत शाहरुख खान, अरबाज खान, सोहेल खान, अर्पिता खान, आयुष शर्मा, अतुल अग्निहोत्री, तब्बू, संगीता बिजलानी, सोनाक्षी सिन्हा, सिद्धांत चतुर्वेदी, कार्तिक आर्यन, जिनिलिया देशमुख, रितेश देशमुख, पुलकित सम्राट, कृती खरबंदा, पूजा हेगडे अशी सिनेसृष्टीतील अनेक मंडळी उपस्थित होती.
View this post on Instagram
वाढदिवसाच्या पार्टीत सलमान खान ब्लॅक लूकमध्ये दिसून आला. सलमानच्या वाढदिवसाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भाईजानने वाढदिवसाचा केक कट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. चाहते, मित्र आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत सलमानने केक कट केला आहे.
संबंधित बातम्या